परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये

परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये

परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ४) वाटाण्याची ६० क्विंटल आवक होती. वाटाण्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा २५० ते ४०० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये रुपये दर मिळाले. 

हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. भेंडीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com