नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा; कांदा बाजार स्थिर

आठ दिवसांत वाटाणा, भेंडी दरात सुधारणा झाली. येथे दर दिवसाला वाटाण्याची १५ ते १७ क्विंटलची आवक झाली व प्रतिक्विंटल ४ ते ६ हजार रुपयाचा दर मिळाला. तर भेंडीची १३ ते १४ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजार रुपये दर मिळाला.
Peas in the city, improvement in the price of okra; Onion market stable
Peas in the city, improvement in the price of okra; Onion market stable

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत वाटाणा, भेंडी दरात सुधारणा झाली. येथे दर दिवसाला वाटाण्याची १५ ते १७ क्विंटलची आवक झाली व प्रतिक्विंटल ४ ते ६ हजार रुपयाचा दर मिळाला. तर भेंडीची १३ ते १४ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजार रुपये दर मिळाला. येथे दर दिवसाला साधारण १२०० ते  १२५० क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे. कांद्याचे दर आठवडाभरापासून स्थिर आहेत, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला, भुसार व कांद्याची आवकही चांगली होत आहे. येथे टोमॅटोची २०० ते २०३ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १ हजार रुपये दर मिळाला. वांगीची ६० ते ६५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार, फ्लॉवरची १०० क्विंटलची आवक होऊन१ हजार ते अडीच हजार रुपये दर मिळाला. 

काकडीची १४४ ते १५० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपये, गवारची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार ५००, घोसाळ्याची २ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५००, दोडक्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजाराचा दर मिळाला. कारल्याची २५ ते २७ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजाराचा दर मिळाला. वाल ची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. घेवड्याची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार, बटाट्याची २९० ते ३०० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजाराचा दर मिळाला. हिरवी मिरचीची ४५ तेत ५० क्विंटलची आवक होऊन ३ ते ३ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.

कांदा दर स्थिर नगर बाजार समितीसह पारनेर, घोडेगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याचे दर गेल्या आठवड्यात १५०० पासून २००० ते २१०० रुपयांपर्यंत स्थिर राहिले, व सरासरी १२०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नगर बाजार समितीत ५० ते ६० हजार गोण्याची प्रत्येक लिलावाला आवक झाली. दोन नंबरच्या कांद्याला १००० ते १५००, तीन नंबरच्या कांद्याला ६०० ते १ हजार व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ६०० रुपयांपर्यंत दर स्थिर होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com