नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिर
Pomegranate in Nashik Inflows decreased; Rate fixed

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या डाळिंब आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे दिसून आले. गत सप्ताहात डाळिंबाची आवक अवघी १८२ क्विंटल झाली. त्यास ४०० तर ९,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७,५०० रुपये राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ३७१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २,७००, तर सरासरी दर २,२०० रुपये राहिला. तर, खरीप लाल कांद्याची आवक ११,६७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २,५००, तर सरासरी दर १,९०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ११,२७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १,३००, तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. लसणाची आवक ४५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ७,५००, तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. आल्याची आवक ५८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,०००, तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांच्या आवकेनुसार दरात चढ-उतार दिसून आला. वालपापडी-घेवड्याची आवक ४,९३४ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ४,५०० असा तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,५०० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक १,१७८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,००० तर सरासरी दर ४,४०० रुपये राहिला. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते ६०० तर सरासरी ३००, वांगी ५०० ते १,१५० तर सरासरी ६८० व फ्लॉवर ३०० ते ५००सरासरी ४०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १५० ते ३३० तर सरासरी२५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. 

ढोबळी मिरचीला ४०० ते ६५० तर सरासरी दर ५५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १४० ते ३२० तर सरासरी २००, कारले ४०० ते ६०० तर सरासरी ५००,गिलके ३५० ते ५८० तर सरासरी ४६० व दोडका ५०० ते ६५० तर सरासरी दर ४६० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.