नगरमध्ये वांगी, फ्लॉवर, डिंगरीच्या दरात तेजी

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दराने तेजी गाठली. वांगीला दहा हजार रुपये प्रती क्विटंलपर्यत दर मिळाला. फ्लॉवर, डिंगरीच्या दरही वाढलेले होते. फळांचीह चांगली आवक सुरू आहे.
नगरमध्ये वांगी, फ्लॉवर, डिंगरीच्या दरात तेजी
Prices of brinjal, flower and dingri rise in the city

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दराने तेजी गाठली. वांगीला दहा हजार रुपये प्रती क्विटंलपर्यत दर मिळाला. फ्लॉवर, डिंगरीच्या दरही वाढलेले होते. फळांचीह चांगली आवक सुरू आहे.    नगर येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात दर दिवसाला टोमॅटोची १७५ ते १८० क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३ हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. वांग्याची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते १० हजार, फ्लॉवरची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ६ हजार, कोबीची १५ ते २० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, काकडीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, गवारची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते १० हजार, घोसाळ्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार, दोडक्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार, कारल्याची १४ ते २० क्विंटलची आवक होऊन  १४ ते १७ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, भेंडीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार, वालशेंगाची ६ ते ७ क्विंटलची आवक होऊन ३ हजार  ६ हजार, घेवड्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार, डिंगरीची ६ ते ८ क्विटंलची आवक होऊन ५ हजार ते ७ हजार, बटाट्याची ८६ ते १०० क्विटंलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५००, हिरव्या मिरचीची ४९ ते ५५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार, शेवग्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार रुपयाचा दर मिळाला. सिमला मिरचीची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार वाटाण्याची ४५ ते ५० क्विंटलची आवक होऊन २५०० ते ३५०० रुपयाचा दर मिळाला आहे.  पालेभाज्यात मेथीच्या दिड हजार ते दोन हजार जुड्याची आवक होऊन शंभर जुड्याला ५०० ते १ हजार, कोथिंबिरीची दिड हजारापर्यंत जुड्याची आवक होऊन २०० ते ९००, पालकच्या ५०० जुड्याची आवक होऊन ३०० ते ७०० व शेपूच्या ६०० ते ७०० जुड्याची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. मोसंबीची आवक वाढली  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांचीही बऱ्यापैकी आवक होत आहे. मोसंबीची ४२ ते ४५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. संत्राची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ६ हजार, डाळिंबाची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १६ हजार, पपईची ३७ ते ४० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, सिताफळाची ७ ते १० क्विटंलची आवक होऊन १ हजार ते ६ हजार, केळीची ९ ते १२ क्विंटलची आवक होउन ६०० ते १ हजार, पेरुची २३ ते २५ क्विवंटलची आवक होऊन ५०० ते ३ हजारांचा दर मिळाला.

सोलापुरात कांदा दर पुन्हा दबावाखाली सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांदा दरात पुन्हा एकदा चांगली सुधारणा झाली. उठावही चांगला मिळाला. कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक ४००० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक प्रतिदिन १०० ते २०० गाड्यापर्यंत राहिली. कांद्याची आवक स्थानिक भागातून अधिक आहे. बाहेरील जिल्ह्यातील आवक तुलनेने कमीच आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरामध्ये काहीसा चढ-उतार सुरू होता. त्यामुळे दर घसरतील, अशी शक्यता होती. पण मागणी असल्याने आणि तेवढ्याच प्रमाणात कांदाही उपलब्ध असल्याने दरात पुन्हा सुधारणा झाल्याचे चित्र आहे. गत सप्ताहात कांद्याला प्रति क्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १६०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची यांच्या दरातील तेजीही कायम राहिली. त्यांची आवकही तशी जेमतेम प्रतिदिन ४० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली.  डाळिंबातील तेजी कायम डाळिंबाची आवक प्रति दिन एक ते दोन टनापर्यंत कायम राहिली. पण मागणी असल्याने दरातील तेजी कायम राहिली. डाळिंबाची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. डाळिंबाला प्रति क्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक १३००० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

दरातील घसरणीमुळे सोयाबीन आवक ५०० क्विंटलवर नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात एक हजार क्विंटल आवक असताना या आठवड्यात ती ५०० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. सोयाबीनच्या दरातही घट नोंदविण्यात आली असून, ७ डिसेंबरला ५००० ते ६९२५ असा दर असताना हे दर आता ४५०० ते ५९३९ वर पोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.  बाजारातील सोयाबीनची आवक सुरुवातीला एक हजार क्‍विंटलवर स्थिरावली होती. मात्र त्यानंतरही दरात सुधारणा झाली नाही परिणामी ही आवक ५०० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. ७ डिसेंबरला २४९५ क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ५००० ते ६६३२ रुपये होते. या आठवड्यात हेच दर ४५०० ते ५९३९ रुपयांवर पोचले आहेत. बाजारात गव्हाची देखील नियमीत आवक आहे.  गव्हाची आवक ३०० क्‍विंटल झाली.  बाजारात संत्रा आवक नियमीत  बाजारात संत्र्याची नियमित आवक होत आहे. गेल्या आठवड्यात २००० क्‍विंटलपर्यंत मोठ्या आकाराची फळे येत होती. त्यात घट होत या आठवड्यात दररोज सरासरी १५०० क्‍विंटल मोठ्या आकाराची फळे बाजारात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने फळांची आवक मंदावली आहे. मोठ्या आकाराच्या फळांना २००० ते २४००, मध्यम फळांना १६०० ते १८०० आणि लहान आकाराच्या फळांना ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. बाजारातील मोसंबीची आवक १५०० क्‍विंटलची आहे. त्यातील मोठ्या फळांचे व्यवहार २१०० ते २४००, मध्यम १६०० ते १८०० आणि लहान फळांचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. जालन्यात सूर्यफुलाची आवक सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सुर्यफुलाची तीन वेळा आवक झाली. सरासरी ५ हजारांच्या आत दर मिळालेल्या सुर्यफुलाबरोबरच, सोयाबीन, तूर, ज्‍‌वारी, बाजरी, मका, हरभऱ्याचे दर जवळपास स्थिर असल्याचे चित्र पहायला मिळाले. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० ते २४ डिसेंबर दरम्यान विविध शेतीमालाच्या आवकेत चढ-उतार पहालयला मिळाला. बाजरीची आठवडाभरात ३२८ क्‍विंटल आवक झाली. २८ ते १४३ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी १६५० ते १९०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. उडदाची आवक ८ ते ५८ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात झाली. एकूण १२४ क्‍विंटल आवक झालेल्या उडदाला सरासरी ४५०० ते ५५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक ४१० क्‍विंटल झाली. ६२ ते १०० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३९०० ते ४४०० रूपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची एकूण आवक ४६१७ क्‍विंटल झाली. ७०१ ते ११०२ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मकाचे सरासरी दर १५११ ते १५५० रुपये प्रति क्‍विंटल दरम्यान राहिले. तुरीची आवक १४३७ ते १९६४ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात मिळून ८५५३ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचे सरासरी दर ५७०० ते ५८५० रूपये प्रति क्‍विंटल दरम्यान राहिले. ज्‍‌वारीची आवक २३७७ क्‍विंटल झाली. ३२४ ते ५५४ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ज्वारीला १७२० ते १८५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. सोयाबीनची सर्वाधिक १० हजार १८३ क्‍विंटल आवक झाली. १७४२ ते २३९६ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ५७०० ते ६१५० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. सुर्यफुलाची तीन वेळा आवक झाली. २० डिसेंबरला ३३ क्‍विंटल, २२ डिसेंबरला २८ क्‍विंटल तर २४ डिसेंबरला १५ क्‍विंटल मिळून ७६ क्‍विंटल आवक झालेल्या सुर्यफुलाचे सरासरी दर ४००० ते ४८११ रुपये प्रति क्‍विंटलचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.