सोलापुरात बेदाण्यास उच्चांकी २०५ रुपये दर 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) बेदाणा लिलावादिवशी एकूण २५ टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी १३ टन बेदाण्याची विक्री झाली आहे.
Raisins
Raisins

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) बेदाणा लिलावादिवशी एकूण २५ टन बेदाण्याची आवक झाली. त्यापैकी १३ टन बेदाण्याची विक्री झाली आहे. यामध्ये विजापूर येथील अप्पाशा कोळी यांच्या बेदाण्यास उच्चांकी २०५ रुपये प्रतिकिलो, तर निंबर्गी येथील गंगाधर बिराजदार यांच्या बेदाण्याला २०१ रुपये असा दर मिळाला. 

आठवड्यातून एकदाच होणाऱ्या या लिलावादिवशी सर्वाधिक २५ टन बेदाणा पहिल्यांदाच आला. या दिवशी बाजारात सर्वसाधारण दर १५० रुपये मिळाला. या लिलावातून एकूण १ कोटी ८८ लाख रुपयांची उलाढाल झाली. या आधीच्या सप्ताहात गुरुवारी सर्वाधिक २५१ रुपयांचा दर मिळाला होता. या बेदाणा बाजारासाठी सोलापूरसह तासगाव, पंढरपुरातील खरेदीदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यंदाच्या हंगामातील हा दुसरा लिलाव होता. सध्या द्राक्षांना पुरेसा दर नाही. त्यामुळे शेतकरी गतवर्षी शीतगृहात ठेवलेला बेदाणा शेतकरी विक्रीस काढून खर्च भागवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com