Chana Rate : हरभरा दराचा पेरणीवर परिणाम होणार

देशातील हरभरा बाजार सुरुवातीपासूनच दबावात राहीला. प्रक्रियादारांना दिवाळीत दरवाढीची अपेक्षा होती. मात्र सरकारच्या धोरणांमुळे दर वाढले नाहीत.
Chana Rate
Chana RateAgrowon

पुणेः देशातील हरभरा बाजार (Chana Market) सुरुवातीपासूनच दबावात राहीला. प्रक्रियादारांना दिवाळीत दरवाढीची अपेक्षा होती. मात्र सरकारच्या धोरणांमुळे दर वाढले नाहीत. आता रब्बीच्या पेरण्याही (Rabi Sowing)सुरु झाल्या. त्यामुळे हरभरा दर दबावात असल्याचा परिणाम पेरणीवर होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

हरभरा बाजार यंदा शेतकरी आणि व्यापारी तसेच प्रक्रियादारांसाठीही निराशाजनक राहिला. देशात यंदा उत्पादन वाढले होते. मात्र सरकारने हमीभावाने खरेदी कमीच केली. देशातील एकूण हरभरा उत्पादनापैकी केवळ १८ टक्क्यांपर्यंत हरभरा सरकारने खरेदी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात विकावा लागला.

Chana Rate
Chana Cultivation : हरभरा लागवड व्यवस्थापनाची सप्तसूत्री

सरकारने खरेदी बंद केल्यानंतर खुल्या बाजारातील दर हे हमीभावापेक्षा कमी झाले. हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ६ हजार ३०० रुपये असताना शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ६ हजार रुपये दरही मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान बहुतेक हरभरा खरेदी केला. त्यानंतर दर ५ हजारांच्याही खाली गेले. शेतकऱ्यांना ४ हजार ५०० रुपयांनीही माल विकावा लागला.

वास्तविक पाहता दिवाळीच्या काळात हरभरा डाळ आणि बेसणला मोठी मागणी असते. व्यापारी आणि प्रक्रियादारही दिवाळीत दरवाढीची आशा बाळगून होते. मात्र नाफेडच्या विक्रीनं हरभरा दर दबावात राहीले. सध्या हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये सरासरी दर मिळतोय. हा दर हमीभावापेक्षाही कमी आहे.

मात्र ऐन दिवाळीतही दर दबावात आहेत. त्यातच रब्बीतील पेरण्या सुरु झाल्या. पेरणीच्या काळात पिकाला चांगाल दर मिळत असल्यास शेतकरी त्या पिकाची लागवड जास्त करतात, असा आजवरचा अनुभव आहे.

सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत हे पाहायला मिळाले. तर तुरीचे दर पेरणीच्या काळात दबावात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. आता पेरणीच्या काळात हरभरा दर दबावात असल्यानं हरभरा पेरणीवरही परिणाम होऊ शकतो, असं कडधान्य बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com