भाजीपाल्यांच्या आवकेत घट; दरात वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक सुमारे २० ट्रकने घटली आहे. खरिपाची तयारी आणि उन्हाळी भाजीपाल्याचे घटलेले उत्पादन यामुळे आवक घटल्या हिरवी मिरची, सिमला मिरची,कोबी, गाजर,शेवगा याच्या दरात वाढ झाली होती.
भाजीपाल्यांच्या आवकेत घट; दरात वाढ
VegetablesAgrowon

पुणे (प्रतिनिधी) : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता.१२) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक सुमारे २० ट्रकने घटली आहे. खरिपाची तयारी आणि उन्हाळी भाजीपाल्याचे घटलेले उत्पादन यामुळे आवक घटल्या हिरवी मिरची, सिमला मिरची,कोबी, गाजर,शेवगा याच्या दरात वाढ झाली होती. तर कांद्याच्या दरात अंशतः वाढ झाली होती.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १० टेम्पो,आंध्रप्रदेश आणि तामीळनाडु येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक येऊन २ टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेश मधून २ ट्रक मटार, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी ४ टेम्पो आवक झाली होती. तर राज्याच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती, टॉमेटो सुमारे ९ हजार क्रेट, फ्लॅावर सुमारे १५ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १०० पोती, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, गावरान कैरी आणि गाजर प्रत्येकी ५ टेम्पो आणि आवक तांबडा भोपळा १० टेम्पो आवक झाली होती. तर कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी सुमारे ४० ट्रक, आणि मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची १५ ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १५०-१८०, बटाटा : १४०-१९०, लसूण : १५०-४००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : ३००-३२०, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : १५०-२००

चवळी : २००-२५०, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १५०-१८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४५०-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ५००-५५०, गाजर : २५०-३२०, वालवर : ३५०-४००, बीट : १८०-२००, घेवडा : ८००-९००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग - ३५०-४००, मटार : परराज्य : १०००-११००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी - २५०-३००, गावरान १५०-२००, चिंच अखंड ३५० फोडलेली ६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-८० (१० किलो), नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दोन लाख तर मेथीची ४० हजार जुडीची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :

कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ७००-१०००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ६००-७००, पालक : ८००-९००

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १२-२५, अ‍ॅष्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १००-१५०, कापरी : ३०-६०, शेवंती : ७०-१३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, मोगरा २००-३००.

फळबाजार

फळबाजारात रविवारी (ता.१२) लिंबाची सुमारे १ हजार गोणी आवक झाली होती. तर डाळिंब सुमारे २० टन, मोसंबी २० टेम्पो, संत्रा अवघा १ टन, पपई २ टेम्पो, चिक्कू ७ हजार गोणी, कलिंगड ८ तर खरबूज सुमारे २ टेम्पो, कोकणातून आंब्याची आवक बंद झाली

असून, पुणे जिल्ह्यातील स्थानिक हापूस आणि इतर वाणांच्या हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यातून विविध आंब्याच्या क्रेट आणि पाट्यांची सुमारे ५ हजार आवक झाली होती. तर कर्नाटकातून सुमारे ८ हजार बॉक्स आणि पेट्यांची आवक झाली होती. तर जांभळाची कर्नाटक मधून सुमारे ३०० क्रेट आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, बारामती येथून ३०० क्रेटची आवक झाली होती. तर करवंदांची देखील एवढीच आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-६००, मोसंबी : (३ ते ४ डझन) : २६०-३५०, संत्रा : (१० किलो) : ५००-१०००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१४०, गणेश : १०-२५, आरक्ता १०-६०. कलिंगड : ७-१०, खरबूज : १५-२५ , पपई : ८-१४, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) ३०-५००, सिताफळ -(किलो) ६०-१५०, कर्नाटक हापूस ४-५ डझन - १२००-१५००, क्रेट मधील प्रति किलो - ५०-८० रुपये, पायरी ४ डझन पेटी - ६००-१०००, क्रेट मधील प्रति किलो ३०-६०, लालबाग ३०-५०, बदाम आणि बैंगणपल्ली प्रति किलो - ३०-४० रुपये. स्थानिक हापूस - १५०-६००,गावरान रायवळ - २०- ५० रुपये डझन.जांभुळ - ८०-१५० प्रति किलो

मटण मासळी

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडी २०० किलो तर नदीच्या मासळीची ५०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली होती. मासेमारी बंदीमुळे बाजारातील खोल समुद्र व खाडीतील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने त्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. बाजारात नदीच्या मासळीची आवकही चांगली असून त्याचे दर टिकून आहेत. गावरान व इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. चिकन व मटणाचे दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : २०००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : १०००-११००, सुरमई : ११००-१४००, रावस : ९००-१४००, घोळ : ८००-९००, करंदी : १८०-२००, पाला : १४००-१६००, वाम : ४००-१०००, ओले बोंबील : ४००-५००.

कोळंबी : लहान ३६०-४८०, मोठी : ६५०-७५०, जंबोप्रॉन्स : १८००-२०००, किंगप्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : २०००, मोरी : २८०-४८०, मांदेली : १००-१२०, खेकडे : ३६०-४४०, चिंबोर्‍या : ४८०-५५०.

खाडीची मासळी : तांबोशी : ६००-६५०, लेपा : २४०-३२०, बांगडा : २८०-३६०, शेवटे : २८०-३२०, तिसऱ्या : २४०-२८०, खुबे : १२०-१४०, तारली : २००-२४०.

नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४४०-५२०, शिवडा : २४०-२८०, खवली : २४०-२८०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २४०, वाम : ५५०-६००.

मटण : बोकडाचे ६६०, बोलाईचे ६६०, खिमा ६६०, कलेजी ७००.

चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३५०.

अंडी : गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ५३३, डझन ७२, प्रतिनग ६.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com