इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या भावाच्या स्पर्धेत पोचला भारतीय कांदा

लाल कांद्याची आवक वाढत असताना भाव किलोला १८ ते २४ रुपयांपर्यंत पोचताच, भारतीय कांदा इजिप्त, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या कांद्याच्या भावाच्या स्पर्धेत पोचला आहे
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या भावाच्या स्पर्धेत पोचला भारतीय कांदा
Onion

नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक वाढत असताना भाव किलोला १८ ते २४ रुपयांपर्यंत पोचताच, भारतीय कांदा (Indian Onion) इजिप्त, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या (Pakistan) कांद्याच्या भावाच्या स्पर्धेत पोचला आहे. (Indian onion getting good rates in Egypt Iran and Pakistan)

त्याचा परिणाम म्हणजे, मलेशियासह (Malasiya) सिंगापूरमधून निर्यातदारांकडे (Exporters) ‘इन्क्वॉयरी‘ वाढली आहे. आर्द्रता कमी असलेला तयार लाल कांद्याची आवक वाढताच, विशेषतः दुबईमध्ये (Dubai) अरब राष्ट्रांच्या बाजारपेठेसाठी पाकिस्तानच्या कांद्याशी टक्कर देणे शक्य होत असताना भाव कोसळण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल, असा निर्यातदारांचा अंदाज आहे.

लासलगावमध्ये शुक्रवारी (ता. १०) लाल कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव २ हजार ६०० रुपये राहिला. पिंपळगावमध्ये २ हजार ५५१ रुपये क्विंटल भावाने विक्री झाली होती. मंगळवारी (ता. १४) लासलगाव आणि पिंपळगावमध्ये २ हजार ३५१ रुपये असा भाव मिळाला. लाल कांद्याच्या भावात घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असताना आयातदारांकडून मागणी वाढू लागल्याने निर्यातीचा वेग वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

हे देखिल पहा - 

कांद्याचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची निर्यात वाढणे महत्वाचे आहे. गेल्यावर्षी देशातून २ हजार ८०० कोटींच्या १५ लाख ७५ हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यात महाराष्ट्रातील दीड हजार कोटींच्या ८ लाख टन कांद्याचा समावेश होता. यंदा देशात ११ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाल्यास २२० लाख टन उत्पादन मिळण्याचा अंदाज श्री. चव्हाण यांनी बांधला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा देशातून ३१ टक्के कमी म्हणजेच, ८ लाख ९९ हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यात महाराष्ट्रातील ४ लाख टन, पश्‍चिम बंगालमधील ३ लाख २० हजार आणि ७५ हजार टन तमिळनाडूतील कांद्याचा समावेश राहिला आहे.

दीड हजार कंटेनर अपेक्षित श्रीलंकामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये मागणी वाढली आहे. श्रीलंकेत भारतीय कांद्याची ६० ते ७० टक्के आणि उर्वरित पाकिस्तानच्या कांद्याची विक्री होत आहे. बांगलादेशमध्ये ८० टक्के कांदा भारतीय खपतोय. श्रीलंकासाठी मुंबईतून मागील आठवड्यात एक हजार टन कांदा रवाना झाला होता. या आठवड्यात दीड हजार टनाची निर्यात श्रीलंकासाठी मुंबईतून अपेक्षित आहे. दरम्यान, निर्यातदार विकास सिंह यांच्या माहितीनुसार मागील आठवड्यात पाकिस्तानच्या कांद्याच्या तुलनेत भारतीय कांद्याचे भाव किलोला १५ रुपयांनी अधिक होते, तर आता हा फरक निम्म्याने कमी झाला आहे.

कांद्याच्या निर्यातीचा भाव (आकडे टनाला डॉलरमध्ये दर्शवतात) ० दुबईमध्ये : इराण आणि तुर्कस्तान-४०० आणि इजिप्त-३५०, तर भारत-४४०. ० भारतीय कांदा : सिंगापूरसाठी-४६०, मलेशियासाठी-४२०, श्रीलंकासाठी-४८० ते ४९० (वातानुकुलित कंटेनरचा वापर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.