Bedana Rate : दसरा, दिवाळीच्या निमित्ताने बेदाण्याच्या दरात सुधारणा

बेदाणा खरेदीची लगबग वाढली : दर टिकून राहण्याची शक्यता
Bedana Rate
Bedana RateAgrowon

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : दसरा, दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याची (Bedana) खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उच्च दर्जाच्या बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे उठावही चांगल्या प्रकारे होत असून, बेदाण्याच्या दरात (Bedana RATE) प्रतिकिलो १० ते १६ रुपयांनी सुधारणा झाली असून, सध्या बेदाण्यास प्रतिकिलोस १३० ते २५० रुपये दर असल्याची माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली. बेदाण्याचे दर टिकून राहतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

Bedana Rate
सणासुदीचे दिवस तोंडावर; तरी बेदाणा बाजार हलेना

राज्यात बेदाण्याचे उत्पादन सुमारे १ लाख ६० हजार टन झाले. नव्या बेदाण्याच्या प्रारंभापासून दरात फारशी तेजी-मंदी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री करण्यापेक्षा साठवणुकीकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु रंगपंचमी, गोकुळाष्टमी या सणांच्या दरम्यान बेदाण्याच्या दरात प्रतिकिलोस पाच ते दहा रुपयांनी सुधारणा झाली. मुळात वर्षभर मागणी असल्यामुळे बेदाण्याची विक्रीही होत असली तरी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून होते. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दरम्यान सुमारे ५० ते ६० हजार टन बेदाण्याची विक्री झाली होती. त्यामुळे त्या वेळी ९० ते एक लाख टनांच्या आसपास बेदाणा शीतगृहात होता. गोकुळाष्टमीपासून ते आजअखेर अंदाजे ३० ते ३५ हजार टन बेदाण्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
आठ ते दहा दिवसांत दसरा सण आला आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून देशभरातील व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदी करण्यासाठीची लगबग सुरू केली असल्याचे चित्र आहे. सांगली, तासगाव, पंढरपूर या बाजार समितीत होणाऱ्या सौद्यांमध्ये सुमारे २००० ते ३००० टन बेदाण्याची आवक होत असून त्याच बेदाण्याची विक्री होत असल्याचे दिसते आहे. सध्या बाजारपेठेत उच्च दर्जाच्या बेदाण्याला व्यापारी अधिक पसंती देत असल्याने बेदाण्याचा अपेक्षित उठाव होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात सुधारणा आहे.
...

Bedana Rate
शेतकरी नियोजन ः बेदाणा

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सौदे राहणार सुरू
बेदाणा विक्रीचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. शून्य पेमेंट अर्थात येणे-देणे व्यवहार पूर्ण करावे लागतात. त्यामुळे दिवाळीपासून सुमारे एक महिना सौदे बंद असतात. यापूर्वी बऱ्यापैकी बेदाण्याची विक्री होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बेदाण्याचे सौदे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील. त्यानंतर बेदाण्याच्या मागणीत आणि दरातही वाढ होईल, अशी शक्यता आहे.
...
प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर
हिरवा बेदाणा : १२५ ते २५०
पिवळा बेदाणा : १२५ ते २००
काळा बेदाणा : ४० ते ६०

दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने बेदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातील वाढ झाली आहे. दिवाळीनंतर बेदाण्याची विक्री आणि दरी वाढतील अशी चिन्ह सध्या दिसत आहेत.
- राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com