सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर

राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी सुरळीत राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर
VegetablesAgrowon

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता.५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी सुरळीत राहिल्याने बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १० टेम्पो,आंध्रप्रदेश , तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटक येऊन २ टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेश मधून ३ ट्रक मटार, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी ४ टेम्पो आवक झाली होती.

तर राज्याच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० पोती, टॉमेटो सुमारे ७ हजार क्रेट, फ्लॅावर सुमारे १५ टेम्पो, कोबी ८ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १०० पोती, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, गावरान कैरी ५ टेम्पो गाजर ८ टेम्पो आणि आवक तांबडा भोपळा ८-१० आवक झाली होती. तर कांद्याची सुमारे ९० ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक बटाट्याची ४५ ट्रक आवक झाली. मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १००-१५०, बटाटा : १७०-२००, लसूण : १००-५००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान व सुरती २५०-३५०, टोमॅटो : ४००-५५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : १५०-२००

चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-२००, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-५००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १२०-१८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ४००-५००, गाजर : २५०-३००, वालवर : ३००-३५०, बीट : १२०-१४०, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १००-१२०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग - ३५०-४००, मटार : परराज्य : १०००-१२००, पावटा : ६००-७००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी - ३००-३५०, गावरान १५०-२५०, चिंच अखंड ३५० फोडलेली ६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१०० (१० किलो), नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची ५० हजार जुडीची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :

कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१२००

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १०-३०, अ‍ॅष्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १२०-१५०, कापरी : ३०-६०, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ६०-१२०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १५०-१८०, शेवंती काडी १२०-२००, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ७०-१००, मोगरा १५०-३००.

फळबाजार

फळबाजारात रविवारी (ता.५) लिंबाची सुमारे १ हजार २०० गोणी आवक झाली होती. तर डाळिंब सुमारे ३० टन, मोसंबी ३ टेम्पो, संत्रा अवघा ३ टन, पपई ४ टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, कलिंगड २० तर खरबूज सुमारे ४ टेम्पो, पेरू २०० क्रेट आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : १०-३०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ७-१०, खरबूज : १५-२० , पपई : ८-१५,

चिक्कू (१० किलो) १००-४५०

मटण मासळी

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि.५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची सुमारे अवघी १०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली होती. मात्र सध्या कोकणातील रत्नागिरी, मालवण, अलिबाग आणि मुंबई किनारपट्टीची मासेमारी बंद असल्याने आवक बंद आहे. यामुळे गुजरात, ओरिसा आणि आंध्रप्रदेशातुन तुरळक आवक असल्याने दरात वाढ झाली आहे. तर कोकणातील खाड्यांमधील पाणी आटल्याने खाडीच्या बहुतांश मासळीची आवक बंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने खापी, नगली, पालू, लेपा, पेडवी, बेळुंजी, तारली यांचा समावेश आहे.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : २०००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम :१२००- १४०० लहान : ८००-९००, भिला : ६००-७००, हलवा : ८००-९००, सुरमई : १०००-१४००, रावस : ८००-१०००, घोळ : ८००, करली : ४००-४८०, भिंग : ३६० -४००, पाला : १२००-१४००, वाम : ९००-१०००,ओले बोंबील : २००-२८०.

कोळंबी : लहान २८०-३६०, मोठी : ४८०-६००, जंबोप्रॉन्स : १८००, किंगप्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : २०००, मोरी लहान : २८०-३६०, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : ३२०-४००, खेकडे : २८०-४००, चिंबोऱ्या : ४८०-५५०.

खाडीची मासळी : सौंदाळे : ३२०-४००, तांबोशी : ५५०-६००, बांगडा : लहान : १६०-२००, मोठा २४०-२८०, शेवटे : ३६०-४००, तिसऱ्या : २४०, खुबे : १००-२००

नदीतील मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२४०, खवली : २००-२२०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २४०-२८०, वाम : ५००-६००.

मटण : बोकड - ६६०, बोलाई ६६०, खिमा ६६०, कलेजी ७००.

चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३५०.

अंडी : गावरान (शेकडा) ८४०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ५२०, डझन ७२, प्रतिनग ६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com