बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थिती; कोबी, बटाट्याच्या दरात अंशतः वाढ; पश्‍चिम घाट परिसरातील हापूस आंब्याची आवक सुरू
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर
VegetableAgrowon

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२९) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर कोबी बटाट्याच्या दरात अंशतः वाढ झाली होती. तर इतर सर्व भाजीपाल्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरातहून हिरवी मिरची सुमारे १० टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ ट्रक, हिमाचल प्रदेश येथून १ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ५ ट्रक , मध्यप्रदेश, गुजरात येथून लसूण १५ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० पोती, भेंडी ८ टेम्पो, तर गवार, कोबी आणि गाजर प्रत्येकी सुमारे ६ टेम्पो, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट्स, फ्लॉवर, सिमली मिरची, तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, भुईमूग शेंगा ६० गोणी, गावरान कैरी ५ टेम्पो, कांदा ६० ट्रक, तर आग्रा, इंदौर, स्थानिक भागातून बटाटा ३५ ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : ८०-१३५, बटाटा : १७०-२१०, लसूण :१००-४००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती २५०-४००, टोमॅटो : ४५०-५५०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : २००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १००-१४०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १८०-२००, शेवगा : ४००-५००, गाजर : २५०-२८०, वालवर : ३५०-४००, बीट :१२०-१४०, घेवडा : ९००-१०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ३५०-४००, मटार : ९००-१२००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी तोतापुरी : १५०-२००, चिंच : अखंड : ३५०, फोडलेली : ६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक दिड लाख तर मेथीची ५० हजार जुडीची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :

कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ८००-१२००

फळबाजार

फळबाजारात रविवारी (ता.२९) लिंबाची सुमारे १ हजार गोणी आवक झाली होती. आवकेमध्ये हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त होते. तर डाळिंब सुमारे ३० टन, मोसंबी ३ टेम्पो, संत्रा अवघा ३ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू ५ हजार गोणी, कलिंगड ३० तर खरबूज सुमारे ५ टेम्पो, कोकणातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून तयार आंब्याच्या सुमारे ३ हजार पेट्या उपलब्ध होत्या, तर कर्नाटकातुन सुमारे ५ हजार बॉक्स आणि पेट्यांची आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४००-६००, मोसंबी : (३ ते ४ डझन) : २००-७००, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २५-१५०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०. कलिंगड : १०-२०, खरबूज : २०-२२ , पपई : ५-१०, चिक्कू (१० किलो) १००-४००, रत्नागिरी हापूस ३ ते ८ डझन : १५००-२५००, कर्नाटक हापूस ४-५ डझन - ८००-१५००, (२ डझन पेटी) - ३००-४००, क्रेट मधील प्रति किलो - ५०-७० रुपये, पायरी ४ डझन पेटी - ६००-८००, क्रेट मधील प्रति किलो ३०-६०, लालबाग ३०-५०, बदाम आणि बैंगणपल्ली प्रति किलो - ३०-४० रुपये.

गावरान आंब्याच्या हंगामाची प्रतिक्षा

कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील मावळ, मुळशी भोर, वेल्हा तालुक्यातून रायवळ आणि हापूस आंब्याची आवक सुरू होते. मात्र अद्याप हंगाम जोमात सुरु झाला नसून, रविवारी (ता.२९) केवळ २० क्रेटची आवक झाली होती. एका डझनला १०० ते १२० रुपये दर होता.

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ३०-५०, अ‍ॅष्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १००-२००, कापरी : ५०-१००, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१५०, जर्बेरा : ४०-६०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) १०००-१३००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, मोगरा ३००-५००.

मटण मासळी

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. २९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे १५० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १६००-१७००, मध्यम :१२००- १४०० लहान : ९००-१०००, भिला : ६००-७००, हलवा : ८००-९००, सुरमई : ८००-१०००, रावस : ९००-१०००, घोळ : ७००-८००, करली : ४००, भिंग : ३०० -४००, पाला : १०००-१४००, वाम : पिवळी ९००-१०००,ओले बोंबील : १२०-२००.

कोळंबी : लहान २००-२८०, मोठी : ३६०-५५०, जंबोप्रॉन्स : १६००-१८००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३२०-३६०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३२०-४००, चिंबोऱ्या : ५५०-६५०.

खाडीची मासळी : सौंदाळे : ४००-४४०, खापी : ३६०-४०० नगली : ५००-६००, तांबोशी : ४००-५५०, पालू : ३२०, लेपा : १६०-२००, बांगडा : लहान : १६०-२००, शेवटे : २००-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १६०-१८०, तिसर्‍या : २८०, खुबे : १२०-१६०, तारली : २००-२४०.

नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२२०, खवली : २४०-२५०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : २४०-२८०, वाम : ५००-५५०.

मटण : बोकड - ६६०, बोलाई ६६०, खिमा ६६०, कलेजी ७००.

चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १९०, बोनलेस ३५०.

अंडी : गावरान (शेकडा) ८२०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ५१०, डझन ६६, प्रतिनग ५.५०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com