Urad Rate : उडदाचे दर तेजीतच राहणार

देशात यंदा उडदाची पेरणी आणि उत्पादनही कमी राहीले. त्यामुळे सध्या देशातील बाजारांमध्ये उडदाची टंचाई भासत आहे. दरही वाढले आहेत.
Urad Rate
Urad RateAgrowon

पुणेः देशात यंदा उडदाची पेरणी (Urad Sowing)आणि उत्पादनही (Urad Production) कमी राहीले. त्यामुळे सध्या देशातील बाजारांमध्ये उडदाची टंचाई भासत आहे. दरही वाढले आहेत. पुढील काळातही उडदाचे दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Urad Rate
Urad Rate: उडीद पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

देशात यंदा कडधान्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. मागील हंगामात तूर, उडीद आणि मुगाचे दर दबावात होते. या तीनही पिकांना हमीभाव मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पेरा कमी केला. त्यातच देशातील विविध भागांमध्ये पाऊस उशीरा सुरु झाल्याचाही परिणाम पेरणीवर झाला. त्यामुळं यंदा खरिपातील कडधान्य उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातही उडदाचं उत्पादन कमी राहील.

देशात मागील हंगामात उडदाचे उत्पादन १ लाख ९४ हजार टन झाले होते. पेराही अधिक होता. मात्र यंदा उडदाची पेरणीही कमी झाली. त्यातच पावसाने पिकाला फटका बसला. परिणामी उत्पादन १ लाख ८४ हजार टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. उडीद उत्पादन कमी राहील्याने एकूण कडधान्याचा पुरवठाही कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

देशातील बाजारात सध्या उडदाची टंचाई भासते. यंदाच्या खरिपात उडदाची पेरणी कमी झाली. परिणामी उत्पादन घटलं. मात्र मागणी कायम आहे. त्यामुळं दरात मोठी वाढ झाली. भविष्यात उडदाच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सकारनं आयात उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयात उडदाचेही दर जास्त आहेत. सध्या देशात उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. उडदाचे दर कायम राहतील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com