Agricultural Department : कृषी विभागाकडून १ हजार ७० प्रस्तावांना मंजुरी

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी ७९ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Sindhudurg News : जिल्हा परिषद (Zilha Parishad) कृषी विभागाकडे (Agriculture Department) विविध कृषी योजनांसाठी प्राप्त झालेल्या १ हजार २८१ प्रस्तावांपैकी १ हजार ७० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांसाठी ७० लाख ६७ हजार ५०४ रुपयांचे अनुदान तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत (Agricultural Department) विविध योजना राबविण्यासाठी ७९ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या योजनांसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून विविध योजनांसाठी प्रस्ताव मागितले होते.

Agriculture Department
Crop Advisory : कृषी सल्ला ः दापोली विभाग

५० टक्के, ७५ टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. योजनांसाठी जिल्ह्यातून १ हजार २८१ प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. त्यातील १ हजार ७० प्रस्तावांना कृषी विभागाने मंजूर दिली आहे.

या योजनांसाठी ७० लाख ६७ हजार ५०४ रुपये अनुदान तालुकापातळीवर वितरित करण्यात आले. यातून शेतकऱ्यांना १०५ पोर्टेबल पंप, ५७ नॅपसॅक पंप, २५० ग्रासकटर, ३३३ ताडपत्री, १०९ क्रेट, ८३ नारळ शिडी, २६ डिझेल इंजिन, ९९ वीजपंप, ८२ पीव्हीसी पाइप पुरविण्यात येणार आहेत.

Agriculture Department
Agriculture Center : अनियमितता करणाऱ्या दोन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

तालुका कृषी विभागाकडे अनुदान वर्ग करण्यात आले असून खरेदीनंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यास सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील २८१ प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मार्चअखेरपर्यत हे प्रस्तावदेखील मंजूर होतील, अशी माहिती कृषी विकास अधिकारी वीरेश अंधारी यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com