कृषी पदव्युत्तर पदवीसाठी १३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश

राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षासाठी १३२४ जागांकरिता प्रवेश दिला जाणार आहे.
Agriculture Stidy
Agriculture StidyAgrowon

पुणे ः राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये (Agriculture College) पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षासाठी १३२४ जागांकरिता प्रवेश दिला जाणार आहे.

राज्यभर दहा विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. चारही कृषी विद्यापीठाच्या (Agriculture University) अखत्यारित ३८ महाविद्यालयांमध्ये सदर अभ्यासक्रम सुरू आहेत. यात ३३ सरकारी, तर पाच अनुदानित कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११, तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नियंत्रणात सात पदव्युत्तर महाविद्यालये आहेत.

Agriculture Stidy
महात्मा फुले कृषी विद्यापीठ बीजोत्पादनात देशात प्रथम

मंगळवार (ता. २६)पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. १३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येतील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या म्हणण्यानुसार, प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक नियमावलीदेखील येत्या मंगळवारीच www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गुणवत्ता, प्रवर्ग आणि विकल्प याचा विचार करून पदव्युत्तरसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश देण्याची पद्धत निश्‍चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती बारकाईने भरावी व प्राधान्यक्रम काळजीपूर्वक नमूद करणे गरजेचे आहे, असे कृषी परिषदेने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com