Bamboo Cultivation : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १४ कोटींचा निधी

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिचपल्‍ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी जुलै २०२२ च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात १४ कोटी १ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्‍यात आली आहे.
Bamboo
BambooAgrowon

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिचपल्‍ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी (Bamboo Research And Training Center) जुलै २०२२ च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात १४ कोटी १ लाख ४७ हजार रुपयांच्या निधीची (Fund For Bamboo Research) तरतूद करण्‍यात आली आहे. वने व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे.

Bamboo
Bamboo : संपूर्ण बांबू केंद्राद्वारे आदिवासींना मिळाला रोजगार

२०१४ मध्‍ये वनमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर त्‍यांनी घेतलेल्‍या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती हा एक निर्णय होता. जिल्ह्यात काही समाज पारंपरिकरीत्या बांबूपासून वेगवेगळ्या रोजच्‍या वापराच्‍या वस्तू बनविण्‍याचा व्‍यवसाय करतात. चंद्रपूर व परिसरात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन होते.

Bamboo
Bamboo Cultivation : कुडाळमध्ये ६०४ हेक्टरवर बांबू लागवड

मात्र काही समुदायापुरता मर्यादित झालेला उद्योग विस्तारित करणे आणि यामध्‍ये नव्‍या तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे होते. याच उद्देशाने मुनगंटीवार यांनी वनविभागांतर्गत येणाऱ्या महाराष्‍ट्र बांबू विकास मंडळामार्फत चंद्रपूरमध्‍ये चिचपल्‍ली परिसरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली. या केंद्रामध्‍ये दोन वर्षांच्‍या अभ्‍यासक्रमाला मान्‍यता मिळाली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी या अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कायमस्‍वरूपी एक मोठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र निर्माण झाले आहे. हा परिसर भारताच्‍या ईशान्‍य पूर्वेकडील राज्‍याला जोडला जात आहे. रोजगार व कौशल्‍य निर्मितीसाठी हे केंद्र नावलौकिकास आले आहे. मंजूर निधीतून प्रकल्‍पातील बांबू कामावर फायर रिटारडंट पॉलिश, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम आणि विद्युत विषयक कामे करण्‍यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com