
Yavatmal Water Issue News : पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत चौदा गावांना पाण्याच्या टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
त्यासाठी प्रशासनाने चौदा खासगी विंधन विहीर अधिग्रहीत केल्या असून पंचायत समिती अंतर्गत कोणत्याही गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची पाळी येणार नसल्याचे संभाव्य कृती आराखड्याद्वारे दिसून येत आहे.
दरम्यान, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्यात चाळीस लाख रुपयांचा संभावित खर्च देखील प्रस्तावित आहे.
एप्रिल ते जून या तीन महिन्यांत पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमरी रोड, किन्हाळा, पाथरी, नागेझरी, वाऱ्हा,धरणतांडा, सरोदे नगर, किन्ही नं,टेंभी,घोन्सी, करणवाडी, मारेगाव केळापुर गणेशपुर (सिंचन) आदि चौदा गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होवू शकते.
त्यासाठी प्रशासनाने चौदाही गावांमध्ये खासगी विंधन विहिरीद्वारे पाणीपुरवठा करणार असून नवीन विंधन विहीर,तात्पुरती नळ योजना, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे, गाळ काढणे, आदींवर एप्रिल ते जून २०२३ मध्ये सोळा लाख छप्पन हजाराचा खर्च प्रस्तावित आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २२ ते जून २०२३ या कालावधीत पंचायत समितीअंतर्गत कोणत्याही गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित नाही. ही समाधानाची बाब आहे.
ऑक्टोबर २२ ते जून २०२३ पर्यंत पाणीटंचाईसाठी चाळीस लाख रुपयांचा अपेक्षित खर्च असून त्यामध्ये दोन नविन विंधन विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
त्याकरिता तीन लाखांचा खर्च प्रस्तावित आहे..एका तात्पुरत्या नळ योजनेवर एक लाख तीस हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.चार नळ योजना दुरुस्तीवर जवळपास सहा लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.
तीन विंधन विहीर विशेष दुरुस्तीवर तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. नऊ ठिकाणी विहीर खोल करणे, गाळ काढणे यासाठी अकरा लाख खर्च करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.