Voter List : सांगली जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीवर १६ हरकती

आटपाडी, तासगाव बाजार समित्यासुद्धा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. एप्रिलमध्ये निवडणूक होत असून अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.
Voter
VoterAgrowon

Sangli News : जिल्ह्यातील सात बाजार समितींच्या निवडणुका (Market Committees Elections) एप्रिलमध्ये होत आहेत. अंतिम प्रारूप मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध झाल्या आहेत.

सांगली बाजार समितीसह तासगाव, आटपाडी बाजार समित्यांसाठी नावात बदलांसह १६ हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, हरकतींवर सुनावली मंगळवारी (ता. १४) होणार असून अंतिम मतदार यादी २० मार्चला प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. मिरज, कवठे महांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे.

Voter
Tur Chana Market : अकोला बाजार समिती तूर, हरभरा आवकेने फुल्ल

याशिवाय आटपाडी, तासगाव बाजार समित्यासुद्धा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. एप्रिलमध्ये निवडणूक होत असून अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

सोसायटी गटातील २८१४ मतदार, ग्रामपंचायत २५२६, हमाल, तोलाईदार १७६४, तर व्यापारी, अडते यांचे १५२८ मतदार आहेत.

बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याचा बुधवारी (ता. ८) शेवटचा दिवस होता. त्यात १२ हरकती दाखल झाल्या.

सांगली बाजार समितीसाठी पूर्वीच्या चार हरकती असून आणखी तीन हरकती दाखल झाल्या. त्याशिवाय तासगाव ४, तर आटपाडीसाठी ५ हरकती दाखल झाल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com