National Agriculture Development Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २० लाभार्थींना १७ लाखांवर अनुदान

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) अंतर्गत २०२२-२३ मध्ये विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना १७ लाख ९० हजार ६०० रुपये अनुदान वितरित करण्यात आले.
Agriculture
Agriculture Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) अंतर्गत २०२२-२३ मध्ये विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना १७ लाख ९० हजार ६०० रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

त्यात काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत कांदा साठवणीसाठी शेतावर १७ शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी केली असून त्यासाठी १२ लाख ६८ हजार ६०० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.

Agriculture
Horticulture Development Scheme : फलोत्पादन विकास योजनांसाठी कसा करणार अर्ज?

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये अस्तरीकरणासाठी १८६ शेततळ्यांचे उद्दिष्ट असून त्यासाठी १ कोटी ३९ लाख ५० रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

संरक्षित शेतीअंतर्गत ३६ शेडनेटगृह, पॉलिहाऊस उद्दिष्ट आहे. त्यासाठी १ कोटी १४ लाख ९८ रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ७२ कांदाचाळ उभारणीसाठी ६३ लाख रुपये आर्थिक तरतूद मंजूर होती.

अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेअंतर्गत २१ रोपवाटिका उभारणीसाठी ५९ लाख ८० हजार रुपये तरतूद आहे. मार्च अखेर शेतावर शाश्वत सिंचनाच्या उपलब्धतेसाठी १ वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण उभारणी झाली असून यासाठी ६८ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत कांदा साठवणीसाठी शेतावर १७ शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी केली असून त्यासाठी १२ लाख ६८ हजार ६०० लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com