‘एमडी’ परीक्षेसाठी १९० अधिकारी अपात्र

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकपदाच्या गट यादीत (पॅनेल) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या १९० अधिकाऱ्यांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या (Sugar Mill) कार्यकारी संचालकपदाच्या गट यादीत (पॅनेल) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या १९० अधिकाऱ्यांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची गट यादी साखर उद्योगात (Sugar Industry) महत्त्वाची समजली जाते. कोणत्याही सहकारी साखर कारखान्याला या यादीशिवाय स्वतःचा कार्यकारी संचालक (Managing Director) (एमडी) नेमता येत नाही. सध्या नवी यादी तयार करण्याचे काम राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांच्याकडून सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातील साखर कारखान्यांच्या सध्याच्या अनुभवी अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Sugar Mill
Sugar Production: दोन साखर कारखान्यांमधील अंतर ३० किलोमीटर करावे

अर्जाची छाननी करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे छाननीअंती पात्र ठरणाऱ्या अर्जांबाबत सर्वच सहकारी साखर कारखान्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, छाननीत १९० अधिकाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. या अधिकाऱ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे कार्यकारी संचालक पदाच्या गट यादीत जाण्याचा मार्गही आता आपोआप बंद झालेला आहे.

Sugar Mill
Sugar Export: श्रीलंकेतून भारतीय साखर, गहू पीठ, तांदळाला मागणी घटली

सहकार विभागाने सहकारी साखर कारखान्यांचा सुधारित आकृतिबंध तयार केलेला आहे. या आकृतिबंधात विभाग प्रमुख किंवा खातेप्रमुख म्हणून काही पदे मान्य करण्यात आली आहे. अशा मान्य पदांचे अनुभव कार्यकारी संचालकपदासाठी ग्राह्य धरले जात आहेत. आकृतिबंधात मान्य नसलेल्या पदावर काम करणारे अधिकारी, शैक्षणिक पुरावे न जोडणारे, कमी अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे.

पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांची आता परीक्षा होईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार ५० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडीसाठी नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्षपद साखर आयुक्तांना देण्यात आले आहे. याशिवाय व्हीएसआयचे महासंचालक, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक या समितीचे सदस्य असून, साखर सहसंचालक (प्रशासन) यांच्याकडे सदस्य सचिवपद देण्यात आलेले आहे.

पारदर्शक परीक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा

साखर आयुक्तालयाने यापूर्वी २००५ मध्ये कार्यकारी संचालकांची गट यादी तयार केली होती. त्यात ६६ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर १०० जणांची दुसरी यादी २०१५ मध्ये तयार झाली होती. यादी तयार करण्यापूर्वी होणाऱ्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सहकार खात्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com