Kharif Season : आगामी खरिपासाठी २ लाख टन खतांची गरज

Chemical Fertilizers : खरीप हंगामात रासायनिक खते मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
Fertilizer Demand
Fertilizer DemandAgrowon

Nagpur News : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यासाठी नॅनो युरिया (Nano urea) बाटल्यांसह एकूण २ लाख ५ हजार ९६० टन खताची गरज असून तशी मागणी कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात रासायनिक खते मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

गतवर्षीचे (रब्बीतील) ९३ हजार ४८४.३४ टन खत अद्यापही शिल्लक असून विविध खरीप पिकांसाठी जिल्ह्याकरिता ६६ हजार २४७ क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७६ हजार ३५९ हेक्टरचे नियोजन केले आहे.

यामध्ये प्रमुख पीक असलेल्या कपाशीचा यंदा २.२५ लाख हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. सोयाबीनचे क्षेत्र ८९,९४० हजार हेक्टर राहणार असून, त्यासाठी ३३,७२८ क्विंटल बियाणे लाणार आहे.

Fertilizer Demand
Nano Urea : राज्यात नॅनो युरियाच्या १७ लाख बॉटल मंजूर

अशी आहे मागणी व शिल्लक खते (टनामध्ये)

खतांचा प्रकार यंदाची मागणी गतवर्षीचे शिल्लक

युरिया - ४२,५८०- २००९१.७८

डीएपी - १९,५४० - १०९८१.५८

एनपीकेएस - ४५,१४०- ३३८५७

एमओपी - ३,१४० - ४९६.०५१

एसएसपी - ३५,७३० - २८०३०.४८

नॅनो युनिया बॉटल्स - ५८,८१०

जिल्ह्यात २७ मार्च २०२३ पर्यंतचा सुमारे ९३,४८४ टन खत शिल्लक आहे. येत्या खरीप हंगामासाठी २ लाख ५ हजार ९६० टन खत लागण्याची शक्यता वर्तविली आहे. खत कमी पडल्यास वेळेवर मागणी करता येईल.
प्रवीण देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com