Nashik Zilha Parishad : नाशिक जि.प.कडून २१ कोटींचा टंचाई आराखडा

‘अल निनो’ हा समुद्री प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा देशातील मान्सूनवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon

Nashik News : ‘अल निनो’ हा समुद्री प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा देशातील मान्सूनवर (Monsoon) विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलै महिन्यानंतरही पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता असल्याने टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे निर्देश शासनाने सर्व जिल्ह्यांना दिले होते.

या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी २०.६७ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात जूनमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. संभाव्य टंचाईवर नियंत्रणासाठी उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत, यंत्रणेला सूचना केल्या होत्या.

Zilla Parishad
Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेत मार्च एन्डची लगबग

यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

यासाठी ग्रामीण भागातील टंचाई आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या पाच वर्षांत जिथे टंचाईची समस्या निर्माण झाली, अशा गावांचा समावेशदेखील टंचाई आराखड्यात करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्यांमधून प्रस्ताव मागवित यासाठी आराखडा तयार केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टंचाई निवारण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील ६०२ गावे व ८६९ वाड्या अशा एकूण १ हजार ४७१ गावे-वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई दर्शविली आहे. यात गावातील तसेच वाड्यांच्या उपाययोजनांसाठी २०६७.५६ कोटींची तरतूद केली आहे.

प्रस्तावित गावांत उपाययोजना

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १४७१ गावांतील संभाव्य पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी या गावांमध्ये प्रगतिपथावर असलेल्या नळयोजनांची कामे तातडीने पूर्ण करणे (२९ कामे), नवीन विंधन विहिरी खोदणे यात ३४ कामांसाठी १.५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण व दुरुस्ती करणे यात १७ कामांसाठी १.७ कोटींचा खर्च तर, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे यात १२३४ कामांसाठी १८.९४ कोटींचा खर्च, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे यात १८७ कामांसाकरिता १.४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com