Amravati Crop Insurance : अमरावती जिल्ह्यात २४ हजारांवर शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

Amravati News: २६ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नाकारण्यात आल्या असून त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
Amravati Crop Insurance
Amravati Crop InsuranceAgrowon

Amravati Crop Insurance News : विमा भरपाईच्या विषयात सुरुवातीला प्रशासनाच्या कायदेशीर कारवाईलाही न जुमानणाऱ्या विमा कंपनीने अखेर परतावे देण्यास सुरुवात केली आहे.

३०,२३३ पैकी ५५८५ शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात झाली असताना २४ हजार ६४८ शेतकऱ्यांना परतावे मिळवण्यासाठी विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणासोबत लढाई कायम आहे.

खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या १ लाख २५ हजार ९०२ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत, त्यापैकी ९९ हजार ५१८ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना स्वीकृत करण्यात आल्या आहेत.

या शेतकऱ्यांना परतावे देण्यास विमा कंपनीकडून प्रचंड त्रास देण्यात आला. वारंवार आंदोलने झालीत. कृषी विभागाने फौजदारी कारवाईचा दम भरल्यानंतरही कंपनीने त्यांच्या वर्तणुकीत व कार्यपद्धतीत बदल केला नाही.

२६ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नाकारण्यात आल्या असून त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा पेच अजूनही सुटलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेलाही कंपनी बांधलेली नाही.

Amravati Crop Insurance
Crop Loan Recovery : शेतकऱ्यांमागे पीककर्ज वसुलीचा तगादा

ज्या शेतकऱ्यांना परतावे मिळालेत त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात नुकसानभरपाई देण्यात आली आहे. याचे स्पष्टीकरण मागण्यात आल्यानंतर असमाधानकारक उत्तर सादर करण्यात आल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीला पुन्हा पत्र देण्यात येत आहे.

दरम्यान, एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी ६९ हजार २८५ शेतकऱ्यांना परतावे देण्यात आले आहेत. यातील शिल्लक राहिलेल्या ३० हजार २३३ पैकी ५,५८५ शेतकऱ्यांना आता परतावे देण्यास सुरुवात झाली आहे.

यासाठी कृषी विभागाला कंपनीसोबत लढाई लढावी लागली. यापूर्वी ६९ हजार २८५ शेतकऱ्यांना ६६ कोटी ८२ लाख रुपयांचा परतावा मिळालेला आहे. त्यानंतर ५,५८५ शेतकऱ्यांना दिलेला परतावा किती आहे, हे मात्र कंपनीने स्पष्ट केलेले नाही. ते कोणत्या प्रमाणात व निकषानुसार देण्यात आले, हेसुद्धा स्पष्ट करण्यास कंपनीने नकार दिला आहे.

विमा परताव्याची स्थिती

एकूण पूर्वसूचना - १,२५,९०२

स्वीकृत सूचना - ९९,५१८

नामंजूर - २६,३८४

परतावे दिले - ६९,२८५

शिल्लक पूर्वसूचना- ३०,२३३

नुकतेच परतावे मंजूर - ५५८५

प्रतीक्षेतील शेतकरी - २४,६४८

Amravati Crop Insurance
Crop Loan Recovery : शेतकऱ्यांमागे पीककर्ज वसुलीचा तगादा
विमा कंपनीकडून शिल्लक राहिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते मिळवून देणार आहे. सध्या ५,५८५ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com