Cashew Orchard Fire : खांबाळे येथील आगीत काजूची २५० झाडे जळाली

आग लागल्याचे समजताच बागायतदार आणि स्थानिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
Cashew Orchard Fire
Cashew Orchard FireAgrowon

Sindhudurg Cashew News : खांबाळे गांगोचा माळ येथे लागलेल्या आगीत तीन काजू बागायतदारांची २५० हून (Cashew producer) अधिक उत्पादनक्षम झाडे जळाली. स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्यामुळे ६०० हून अधिक झाडे वाचली. या बागायतदारांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

खांबाळे गांगोचा माळरानाला लागलेली आग जोरदार वारा आणि कडक उन्हामुळे अधिकच भडकली. ही आग काजू बागायतदार धनाजी पवार, रमेश पवार आणि प्रकाश पवार यांच्या बागेमध्ये पसरली.

आग लागल्याचे समजताच बागायतदार आणि स्थानिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

Cashew Orchard Fire
Cashewnut Market : उत्पादन कमी तरीही काजू बीच्या दरात घट

परंतु तत्पूर्वी धनाजी पवार यांची सुमारे दीडशेहून अधिक झाडे आगीत जळाली होती. रमेश पवार यांच्या बागेतील ४० झाडे जळाली.

आग विझविल्यामुळे त्यांची ३०० हून अधिक झाडे वाचविण्यात यश आले. याशिवाय प्रकाश पवार यांचीदेखील ६० झाडे जळाली. ही सर्व झाडे उत्पादनक्षम होती.

झाडावर परिपक्व झालेली काजुची बी जळून गेली. यात काजू बागायतदारांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com