Water Supply : मोखाड्यात २७ गावांना टॅंकरने पुरवठा

गतवर्षी तालुक्यात टंचाई काळात ६८ गावपाड्यांना २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता.
Water Supply
Water SupplyAgrowon

Mokhada News : उन्हाच्या काहिलीने नागरिक मार्च महिन्‍याच्या पहिल्याच आठवड्यात त्रस्त झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे मोखाड्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

उन्हाच्या काहिलीने मोखाड्यात विहिरींनी तळ गाठला असून, त्‍यामुळे टंचाईग्रस्त गाव पाड्यांमध्ये वाढ झाली आहे.

सद्यस्‍थितीत तालुक्यात २७ गावपाड्यांना ११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सुमारे १५ हजारांहून अधिक नागरिक आणि पाळीव जनावरांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा भीषण पाणीटंचाईचा तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने, येथे सरकारी टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Water Supply
Water Supply Scheme : पाणीपुरवठ्याच्या योजनांकडे थकले ७८ कोटींचे वीजबिल

उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त झाले असून, मोखाड्यातील गावपाड्यांतील विहिरींनी तळ गाठला आहे. सद्यस्‍थितीत मोखाडा तालुक्यात दापटी १ आणि २, हेदवाडी, ठवळपाडा, स्वामीनगर, कुंडाचा पाडा, गवरचरी पाडा, किनिस्ते, निळमाती, वारघड पाडा, भोवाडी, धामणी, धामोडी, मडक्याची मेट, आंब्याचा पाडा, हिंबड पाडा, कुंडाचा पाडा, डोंगरवाडी, अंधेरवाडी, हुंड्याचीवाडी, हट्टीपाडा, वाघ्याची वाडी, घानवळ, पाटीलपाडा आणि ठाकूरपाडा यांसह २७ गावपाड्यांना ११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

सुमारे १२ हजार लिटर क्षमतेचे ११ टॅंकर ३२ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव पाड्यांमधील सुमारे १५ हजार ६०५ नागरिक आणि जनावरांची तहान भागवली जात आहे.

Water Supply
KDMC Water Scheme : 'केडीमसी'च्या ‘अमृत’जल योजनेला शासनाची मंजुरी

गतवर्षीच्या तुलनेत संख्या वाढणार

गतवर्षी तालुक्यात टंचाई काळात ६८ गावपाड्यांना २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मार्च महिन्याच्या मध्यान्ही टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या २७ वर गेली आहे. ११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ऊन्हाच्या तडाख्याने ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे गतसालच्या तुलनेने यावर्षी तालुक्यात टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत चालले असून मोखाडा तालुक्यात याची झळ अधिकर तीव्र होत चालली आहे. यामुळे मानवासह पाळीव व जंगली पशू-पक्ष्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

टँकरमुळे दिलासा

1 उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने, टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्याही वाढू लागली आहे. तालुक्यातील आसे, तुंगारवाडी, उधळे आणि हट्टीपाडा येथील विहिरींनी तळ गाठला आहे.

2 त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपकाळातही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याने टंचाईग्रस्त गाव पाड्यांतील नागरिक आणि जनावरांना दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com