Dam Water : धरणांत चोवीस तासांत २.७२ टीएमसी पाणीसाठा

गेल्या आठवड्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने शेते भरून वाहत आहेत.
Dam Water
Dam Water Agrowon

पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर (Rain Force In Dam Catchment Area) चांगलाच वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांतील आवकेत वाढ (Water Level Increase In Dam) होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत धरणांत नव्याने २.७२ टीएमसी एवढी आवक झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांत आता ११.५ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) झाला आहे.

Dam Water
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

गेल्या आठवड्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने शेते भरून वाहत आहेत. त्यातच घाटमाथ्यावरही पावसाच्या मुसळधार धारा कोसळत आहेत. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय लोणावळा घाटमाथ्यावर १३१, वळवण १०१, ठोकरवाडी ९७ मिलिमीटर पाऊस पडला.

Dam Water
पेण ः भातशेती नुकसानीचे पंचनामे होणार

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोर वाढला आहे. या क्षेत्रात ९२ मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव ९१, वडिवळे ८८, टेमघर ६७, गुंजवणी ६७, नीरा देवघर ६७, माणिकडोह ६०, पवना ५५, भामा आसखेड २८, वडज २७, कळमोडी २६, कासारसाई व डिंभे येथे २१ मिलिमीटर पाऊस पडला. तर, खडकवासला, चासकमान, भाटघर, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, नाझरे, चिल्हेवाडी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

तर, शेटफळ, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. मात्र, पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या आवकेत हळूहळू वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू लागला आहे.

गेल्या चोवीस तासांत, गुरुवारी (ता.७) सकाळी आठवाजेपर्यंत झालेली पाण्याची आवक, टीएमसीमध्ये :

टेमघर ०.०८, वरसगाव ०.३९, पानशेत ०.३४, खडकवासला ०.०६, पवना ०.१५, कळमोडी ०.०७, चासकमान ०.०६, भामा आसखेड ०.०५, वडिवळे ०.०१, शेटफळ ०.०१, गुंजवणी ०.१४, भाटघर ०.७३, नीरा देवघर ०.३१, वीर ०.०९, पिंपळगाव जोगे ०.१३, माणिकडोह ०.०३, येडगाव ०.०१, डिंभे ०.१५, चिल्हेवाडी ०.०१, मुळशी ०.७२,

गेल्या आठ दिवसांत धरणांत झालेली आवक, टीएमसीमध्ये :

दिनांक --- झालेली आवक

२९ जून -- ०.३६

३० जून --- ०.४३

१ जुलै --- ०.५२

२ जुलै --- ०.६०

३ जुलै --- ०.६६

४ जुलै --- ०.७८

५ जुलै -- १.०७

६ जुलै -- १.८३

७ जुलै -- २.७२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com