Crop Damage Compensation : बाधित ३ लाख ९० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

बाधित शेतकऱ्यांना अर्थसाह्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २४७ कोटी १६ लाख ९२ हजार २८८ रुपये निधीची मागणी केली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Parbhani News : सततच्या पावसामुळे गतवर्षी सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यांतील परभणी जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान (Kharif Crop Damage) झाले.

बाधित शेतकऱ्यांना अर्थसाह्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २४७ कोटी १६ लाख ९२ हजार २८८ रुपये निधीची मागणी केली आहे. परंतु राज्य शासनाकडून निधी वितरणास मंजुरी मिळाली नसल्यामुळे बाधित शेतकरी मदतीच्या (Compensation) प्रतीक्षेत आहेत.

गतवर्षीच्या पावसाळ्यातील सततच्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ तालुक्यांतील मिळून एकूण १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता

त्यात सोयाबीन १ लाख १५ हजार २१० हेक्टर, कपाशी ६२ हजार ६९४ हेक्टर, मूग ७०.८४ हेक्टर, उडीद ७०.८४ हेक्टर, ज्वारी ६४७ हेक्टर, तूर २ हजार ९०१ हेक्टर, तसेच इतर पिकांच्या १४७ हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे.

बाधित शेतकऱ्याना वाढीव दराने आर्थिक प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयांनुसार अर्थसाह्य देण्यासाठी २४७ कोटी १६ लाख ९३ हजार रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. परंतु त्यास मंजुरी मिळालेली नाही. तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चार तालुक्यांत मदतवाटप सुरू...

सप्टेंबर-ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा या चार तालुक्यांतील ९२ हजार ७३७ शेतकऱ्यांच्या ५६ हजार १७५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती. वाढीव दराने प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये नुसार परभणी जिल्ह्यासाठी ७६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी निधी प्राप्त झाला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधीचे वितरण केले जात आहे. गुरुवार (ता. १६) पर्यंत ६६ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८ कोटींवर रक्कम जमा करण्यात आली.

Crop Damage
Crop Damage : पाडलोसमध्ये गव्यांकडून चवळी पिकाचे नुकसान

बाधित शेतकरी, बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये), निधी (कोटींत)

तालुका - बाधित शेतकरी- बाधित क्षेत्र - अपेक्षित निधी

परभणी- ३६१४३ २८८३४ ३९.२१

जिंतूर - ८३८७४ ३९११६ ५३.१९

सेलू - ४५६२० १९४२० २६.४१

मानवत - ३८३२३ १६९२४ २३.०१

पाथरी - २८१५१ १२६५३ १७.२०

सोनपेठ - ३१२३० १६१०० २१.८९

गंगाखेड - ५१४१९ १४९०० २०.२६

पालम - ५०५५६ २१५६५ २९.३२

पूर्णा - २५४४२ १२२३० ८.३१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com