Water Conservation : श्रमदानातून उभारले ३ हजार वनराई बंधारे

राज्यात झालेल्या अतिपावसामुळे उपलब्ध झालेल्या ओढे व नाल्यांमधील पाणी प्रवाहांना अडवण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याची मोहीम कृषी विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत श्रमदानातून तीन हजार बंधारे उभारले गेले आहेत.
Due To Heavy Rains
Due To Heavy RainsAgrowon

पुणे ः राज्यात झालेल्या अतिपावसामुळे (Heavy Rains ) उपलब्ध झालेल्या ओढे व नाल्यांमधील पाणी प्रवाहांना अडवण्यासाठी वनराई बंधारे (Vanrai Barrage) उभारण्याची मोहीम कृषी विभागाने (Agriculture Department) सुरू केली आहे. आतापर्यंत श्रमदानातून तीन हजार बंधारे उभारले गेले आहेत.

वनराई बंधारे बांधलेल्या भागांमधील जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास तसेच जलसंधारणास मदत होणार आहे. रब्बी हंगामासाठी पिकांना व पशुपक्ष्यांसाठी पाणीसाठे उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडेल, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. आदिवासी भागातील रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यासाठी शेकडो गावांमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी शेतकऱ्यांना या उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानदेखील केले आहे.

Due To Heavy Rains
Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा तडाखा

“राज्यात यंदा पाऊस लांबला. त्यामुळे खरिपाचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती रोखण्याचे साधन कृषी विभागाच्या हातात नाही. मात्र, याच पाण्याचा वापर रब्बी हंगामासाठी कसा करता येईल, याबाबत उपाय करता येतात. त्यामुळेच ‘आम्ही वनराई बंधारे उभारणी’ उपक्रम राज्यभर हाती घेतला. रब्बीमध्ये यंदा गहू व हरभरा या दोन मुख्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. वनराई बंधारे झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांसाठी अतिरिक्त पाणी साठ्याचा उपयोग होईल,” अशी माहिती एका तालुका कृषी अधिकाऱ्याने दिली.

नाशिक, विदर्भ, मराठवाडा विभागांतील काही गावांमध्ये वनराई बंधाऱ्यांची वेगाने उभारणी सुरू आहे. “हा बंधारा बांधण्यासाठी कोणताही निधी खर्च केला जात नाही. केवळ सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांची उपलब्धता ही मुख्य बाब आहे. रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरली जाते. पाणी वाहणाऱ्या नाल्याच्या योग्य ठिकाणी प्रवाहाला आडव्या रांगेत वाळूच्या गोण्या टाकल्या जातात. दोन गोण्यांमधील फटीत माती भरली जाते. यातून कमी खर्च व कमी श्रमात चांगला बंधारा तयार होतो. हा बंधारा तात्पुरता असला तरी त्याचे लाभ लगेच पुढील हंगामासाठी होतात,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

“राज्यात झालेल्या चांगल्या मॉन्सूनचा उपयोग कृषी खात्याने जलसंधारणासाठी केला आहे. कृषी कर्मचारी, शेतकरी, गावकरी आणि उद्योग सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अशा चार घटकांनी एकत्र येत आम्ही आतापर्यंत तीन हजार वनराई बंधारे उभारले आहेत.”

- धीरज कुमार, कृषी आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com