Apmc Election Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३७८ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या सात बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ जागांसाठी ३७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत.
 Election
ElectionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या सात बाजार समित्यांच्या (Market Committee) प्रत्येकी १८ जागांसाठी ३७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. अर्ज मागे घेण्याची गुरुवार (ता. २०) ही शेवटची तारीख होती हे विशेष.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, लासुर स्टेशन, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कन्नड या सात बाजार समित्यांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक बाजार समितीच्या १८ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात ३७८ उमेदवार प्रत्यक्ष माघारीच्या मुदतीनंतर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे.

त्यामध्ये फुलंब्री बाजार समितीमधील ४२, पैठणमधील ३८, लासूर स्टेशनमधील ५८, वैजापूरमधील ५६, छत्रपती संभाजीनगरमधील ४७, गंगापूरमधील ५१ व कन्नडमधील ८६ उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

 Election
Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट झालेल्या चित्रातून सहकारी संस्थांच्या मतदारसंघातील विविध प्रवर्गातील जागांसाठी २३५, ग्रामपंचायतच्या मतदार त्यातील विविध जागांसाठी ८१, व्यापारी, अडते मतदार संघातील ३५, तर हमाल मापाडी मतदार संघातील २७ उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

युती व महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’...

स्थानिक पातळीवरील गट तटाच्या आधारावर या निवडणुका लढविल्या जात असल्या तरी बाजार समित्यांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी युती व महाविकास आघाडी दोन्हींच्या माध्यमातून बाजार समित्यांच्या निवडणुकीत जोर लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

त्यासाठी महाविकास आघाडी व युतीच्या, माध्यमातून पॅनेल व विजयी रणनीतीचा फार्म्यूला ठरल्याचे सूतोवाच केले जात आहे.

जागांच्या वाटाघाटीतील धुसफुस प्रत्यक्ष निवडणूक निकालावर किती परिणाम करते हे काळच सांगेल. महाविकास आघाडीकडून वज्रमुठीचा, तर भाजप व शिदेंच्या शिवसेनेकडून युती अभेद्य असल्याचा दावा नेते करत आहेत.

प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर जसजशी मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत गटातटाच्या राजकारणात काय घडते यावरही बरच काही अवलंबून असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com