Water Stock In Nandurbar : सारंगखेडा बॅरेजमध्ये ३८ टक्के जलसाठा

Water Shortage : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवर असलेल्या बॅरेजमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याच्या पातळीत घट होत आहे.
Water
Water Agrowon

Water News Nandurbar : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवर असलेल्या बॅरेजमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याच्या पातळीत घट होत आहे. विशेषत: या आठवड्यात परिणाम जाणवायला लागलेला आहे.

अशीच परिस्थिती राहिल्यास पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील विविध धरणांच्या पाण्याच्या पातळीत घट होत आहे. जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेल्याने कूपनलिका, विहिरीनींही तळ गाठले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतातूर झाला आहे.

त्यातच शहादा तालुक्याच्या तापी काठावर असलेल्या गावांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधील जलसाठा काहीशा प्रमाणात कमी होत आहे. त्यातच सारंगखेडा बॅरेजला मुख्य दरवाजांना मोठ्या प्रमाणात सातत्याने गळती सुरू असते. त्यामुळे देखील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.

Water
Water Shortage : शहापूर तालुक्यात पाणीटंचाई आणखी तीव्र

या प्रकल्पात सिंचन क्षेत्र कमी असल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय घट होत नाही. फक्त उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी कमी होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्याने एक ते दोन मीटरपर्यंत पातळीत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीच परिस्थिती प्रकाशा येथील बॅरेजची राहू शकते. दोन्ही सिंचन प्रकल्पाची सिंचन क्षेत्र कमी असल्याने पाणीसाठ्यात घट होत नाही मात्र तीव्र उन्हामुळे पाणी कमी आहे.

एकंदरीत दिवसेंदिवस वाढणारे तापमान सर्वच घटकांवर परिणाम करत आहेत. सारंगखेडा बॅरेजमध्ये सोमवारी (ता. १५) पाण्याची पातळी ११७.९० इतकी आहे. तर ३८.८० टक्के, अर्थात ३५.६३ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या साठा आहे.

दरवाजांच्या दुरुस्ती व्हावी

बॅरेजचा दरवाजांची दुरुस्ती होत नसल्याने गेल्या पाच, सहा वर्षांपासून दरवाजांना गळती लागली आहे. त्यामुळे साठा करण्यात आलेले पाणी वाया जात आहे. उन्हाळ्यात या प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने पूर्वेस भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवते. प्रकल्पाचा लोखंडी दरवाजे पाण्यात असल्याने गंज चढून दरवाजांचे खालचे भाग विघटन होत आहे.

Water
Water Storage In Marathwada : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर
सारंगखेडा बॅरेजची सध्याची पाण्याची पातळी ३८ टक्के आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा टक्के पाणीसाठा जास्त आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च, एप्रिल महिन्यांत वारंवार अवकाळी पाऊस झाला. तसेच उन्हाची तीव्रता काही अंशी कमी होती. अचानक मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. या महिन्यात पाण्याची पातळीत पुन्हा घट होईल. असा अंदाज आहे.
पीयूष पाटील, प्रकल्प अभियंता, सारंगखेडा (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com