Solapur Collector Office Revenue : सोलापुरात मुद्रांक विभागाला दस्त नोंदणीतून ३९३ कोटीचा महसूल

शासनाने मुद्रांक कार्यालयाला मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात मुद्रांक नोंदीतून ३८० कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिल होते.
Solapur News
Solapur NewsAgrowon

Solapur News : सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Office) गतवर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे १३ कोटी रुपयांची अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे.

शासनाने मुद्रांक कार्यालयाला मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात मुद्रांक नोंदीतून ३८० कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिल होते. परंतु प्रत्यक्षात ३९३ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल वसुल झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दस्त नोंदणीसाठी गर्दी वाढली. विशेषतः मार्चएण्डींगमुळे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मुद्रांक कार्यालयात सर्वाधिक वर्दळ राहिली. त्यासाठी तालुकास्तरावर काही कार्यालयाने वेळेत कामासाठी सुविधाही दिल्या.

Solapur News
Solapur Zilha Parishad : मुदतवाढीला नकार; तत्काळ खुलासा द्या

त्यामुळे दस्त नोंदणीचा वेग वाढला. गेल्यावर्षी २०२१-२२ मध्ये मुद्रांक कार्यालयाकडे ९० हजार ५२३ दस्त नोंदणीतून ३८१ कोटी २३ लाखाचा महसूल जमा झाला.

तर फेब्रुवारी अखेर १ लाख २ हजार १३२ दस्त नोंदणीतून तब्बल ३९३ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सर्वात जास्त महसूल जुलै महिन्यात तर सर्वात कमी महसूल एप्रिल महिन्यात मिळाला आहे, असे सांगण्यात आले.

दरमहा वसूल झालेला महसूल

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात २६ कोटी ८१ लाख रुपये, मे महिन्यामध्ये ३४ कोटी २९ लाख रुपये, जूनमध्ये ४० कोटी २० लाख रुपये, जुलैमध्ये ४० कोटी २६ लाख रुपये, ऑगस्टमध्ये ३५ कोटी २३ लाख रुपये, सप्टेंबरमध्ये ३६ कोटी ७२ लाख रुपये, ऑक्टोबरमध्ये ३२ कोटी ५३ लाख रुपये, नोव्हेंबरमध्ये ३८ कोटी ७६ लाख रुपये, डिसेंबरमध्ये ३८ कोटी ८३ लाख रुपये, जानेवारीमध्ये ३५ कोटी ६१ लाख रुपये आणि फेब्रुवारीमध्ये ३४ कोटी ४४ लाख रुपये जमा झाले.

केवळ फेब्रुवारीअखेर तब्बल ३९३ कोटी ६८ लाखाचा महसूल जमा झाला आहे. मार्चमध्येही किमान ५० कोटी रुपयांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com