Crop Damage Fund Demand Parbhani : पीक नुकसान मदतीसाठी ४ कोटींवर निधीची मागणी

बाधित क्षेत्रामध्ये २ हजार ९६६.६१ हेक्टरवरील जिरायती पिके, ६९७.९० हेक्टरवरील बागायती पिके, २९६.३० हेक्टरवरील फळपीकांचा समावेश आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) मार्च महिन्यात मंगळवार (ता. १४) ते रविवार (ता. १९) या कालावधीतील वादळी पावसामुळे सहा तालुक्यांतील ५ हजार ९९९ शेतकऱ्यांच्या ३ हजार ९६०.८१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

पंचनामे (Survry) पूर्ण झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. बाधित क्षेत्रामध्ये २ हजार ९६६.६१ हेक्टरवरील जिरायती पिके, ६९७.९० हेक्टरवरील बागायती पिके, २९६.३० हेक्टरवरील फळपीकांचा समावेश आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अपेक्षित ४ कोटी ३७ लाख ४७ हजार रुपये निधीची मागणी केली आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

वादळी पाऊस, गारपिटीमुळे परभणी, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील ९ हजार १९१ शेतकऱ्यांच्या ५ हजार ९९८.९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पंचनाम्यानंतर बाधित शेतकरी आणि क्षेत्र अंतिम करण्यात आले.

त्यानुसार परभणी, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांतील ५ हजार ९९९ शेतकऱ्यांच्या ३ हजार ९६०.८१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

त्यात २ हजार ९६६.६१ हेक्टरवरील जिरायती पिके, ६९७.९० हेक्टरवरील बागायती पिके, २९६.३० हेक्टरवरील फळपीकांचा समावेश आहे.

Crop Damage
Marathwada Crop Damage Survey : परभणी, हिंगोली, धाराशिवमधील पंचनामे पूर्ण

पाच तालुक्यातील जिरायती क्षेत्रातील ४ हजार २८ शेतकऱ्यांच्या १ हजार ९३२.११ हेक्टर ज्वारी, ८११.९० हेक्टर गहू, ४० गुंठे मका, १५५.२० हेक्टर हरभरा, ८ हेक्टर सोयाबीन असे एकूण २ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

पाच तालुक्यांतील १ हजार ४०० शेतकऱ्यांचे ६२.२० हेक्टर भाजीपाला,२७२ हेक्टर बागायती गहू,१ हेक्टर ऊस,४.९० हेक्टर मिरची, १२० हेक्टर कांदा, २०९ हेक्टर टरबूज असे एकूण ६९७.९० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले.

सहा तालुक्यातील ५७१ शेतकऱ्यांच्या २.६० हेक्टर केळी, ४ हेक्टर पपई, ५ हेक्टर मोसंबी, १६.१० हेक्टर आंबा, १ हेक्टर चिकू, २५५.२० हेक्टर संत्रा असे एकूण २९६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सर्व पिकांचे बाधित क्षेत्र २ हेक्टर पर्यंत मर्यादेत आहे.जिरायती पीक नुकसानी बद्दल प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १७ हजार रुपये, फळपीकांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत दिली जाईल.

त्यानुसार जिरायती पिकांसाठी एकूण २ कोटी ५२ लाख १६ हजार रुपये, बागायती पिकांसाठी १ कोटी १८ लाख ६४ हजार रुपये, फळपीकांसाठी ६६ लाख ६७ हजार रुपये असे एकूण ४ कोटी ३७ लाख ४७ हजार २३५ रुपये अपेक्षित निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे आहे.

Crop Damage
Unseasonal Rain & Crop Damage : अवकाळीचा २०० हेक्टरवरील पिकांना फटका

तालुकानिहाय एकूण पीक नुकसान क्षेत्र, मदत निधी (क्षेत्र हेक्टरमध्ये, निधी लाख रुपये)

तालुका - बाधित शेतकरी- बाधित क्षेत्र- मागणी निधी

परभणी - ३२२८ - २४२९- २४०.३८

पूर्णा - १३९४ - ७३०.१६ - ८४.७८

जिंतूर - १२०७- ७२१.७०- ९८.२५

गंगाखेड - १५६ - ७०.०५ - ११.८७

सोनपेठ ७ - ५- - १.१२

पालम - ७- ४.९०- १.०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com