
Frp News : यंदाच्या हंगामात कोल्हापूर (Kolhapur) विभागातील साखर कारखान्यांनी गाळप (Sugarcane Crushing) केलेल्या ऊसबिलाच्या ‘एफआरपी’पोटी ४ हजार ६३० कोटी ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना आदा केले. एकूण देय ‘एफआरपी’पैकी (FRP) ९० टक्के रक्कम अदा झाली आहे.
विभागातील ३४ कारखान्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील १० तर सांगलीतील ९ अशा १९ कारखान्यांनी ‘एफआरपी’ची १०० टक्के रक्कम अदा केली.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील १५ सहकारी, ६ खासगी व सांगली जिल्ह्यातील १० सहकारी व ३ खासगी अशा एकूण ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे.
बहुतांश कारखान्यांनी पहिल्या उचलीपोटी एकरकमी ‘एफआरपी’ची रक्कम देण्याची घोषणा केली. यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन २९०० पासून ते ३२०९ रुपयांपर्यंत दर मिळू लागला. साडेतीन महिन्यांच्या गाळपानंतर हंगाम अंतिम टप्प्यात आहेत.
यंदा हंगामात विभागातील ३४ साखर कारखान्यांनी ३१ जानेवारीअखेर १ कोटी ७३ लाख ११ हजार ९९१ टन उसाचे गाळप केले. जानेवारी २०२३ अखेरील गाळप ऊस बिलाच्या ‘एफआरपी’पोटी ५ हजार ०६८ कोटी १७ लाख रुपये देय होती.
कारखान्यांनी ४ हजार ६३० कोटी ६८ लाख आदा केले. ३४ पैकी १९ कारखान्यांनी ‘एफआरपी’ची १०० टक्के रक्कम आदा केली.
कारखानानिहाय दिलेली एफआरपी ः
कोल्हापूर जिल्हा : कारखाना, कंसात अदा ‘एफआरपी’ची टक्केवारी : आजरा, गवसे (८२ टक्के), भोगावती, परिते (४४), छ. राजाराम, कसबा बावडा (८५), छ. शाहू, कागल (१००), दत्त, शिरोळ (१००), दूधगंगा वेदगंगा, बिद्री (७७), जवाहर, हुपरी (१००), सदाशिवराव मंडलिक (८१), कुंभी कासारी, कुडित्रे (८३), पंचगंगा, इचलकरंजी (८५) शरद, नरंदे (१००), तात्यासाहेब कोरे, वारणा (१००), अथणी शुगर, बांबवडे (१००), डी. वाय. पाटील, असळज (८६), दालमिया, आसुर्ले-पोर्ले (१००), गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी (८६), इकोकेन एनर्जी, म्हाळुंगे (१००), ओलम ॲग्रो, राजगोळी खुर्द (८२), संताजी घोरपडे, बेलेवाडी काळम्मा (८५), अथणी शुगर, तांबाळे (१००), अथर्व इंटरट्रेड-दौलत (१००).
सांगली जिल्हा : हुतात्मा, वाळवा (६७ टक्के), राजारामबापू पाटील युनिट नं.१, साखराळे (१००), युनिट नं. २, वाटेगाव (१००), युनिट नं.३, कारंदवाडी (१००), युनिट नं.४, जत (१००), सोनहिरा, वांगी (१००), दत्त इंडिया प्रा.लि. वसंतदादा, सांगली (६९), विश्वासराव नाईक, चिखली (१००), क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, कुंडल (६९), मोहनराव शिंदे, आरग (१००), निनाईदेवी दालमिया, करूंगळी (१००), सद्गुरु श्री श्री, राजेवाडी (६८), उदगिरी शुगर, बामणी (१००).
दृष्टिक्षेपात गाळप हंगाम स्थिती
विभागातील साखर कारखाने - ३४
३१ जानेवारीअखेर गाळप - १ कोटी ७३ लाख
देय ‘एफआरपी’ची रक्कम - ५०६८ कोटी १७ लाख
शेतकऱ्यांना आदा केलेली रक्कम - ४६३० कोटी ६८ लाख
१०० टक्के ‘एफआरपी’ दिलेले कारखाने - १९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.