
Chhatrapati Sambhajinagar News : ‘महावितरण’च्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची ४०८५ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी ६ कोटी ८४ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.
या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १७५ प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘महावितरण’तर्फे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात एप्रिल -२०२२ ते मार्च-२०२३ या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १४१७, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात १८६८, तर जालना मंडलात वीजचोरीची ८०० प्रकरणे उघडकीस आली.
एकूण ४०८५ प्रकरणांत ग्राहकांना ६ कोटी ८४ लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली. यातील ५९५ ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांची १ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम महावितरणने वसूल केली आहे.
ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाहीत, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया ‘महावितरण’तर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात ३, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात ४४, तर जालना मंडलात १२८ प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहील. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.