Animal Husbandry Recruitment : पशुसंवर्धन विभागात ४२१ पदांना कात्री

Animal Husbandry Department : नव्या आकृतिबंधानुसार ४४६ पदांची भरती
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mumbai News : २०१७ पासून रखडलेल्या पशुसंवर्धन विभागातीलभरती प्रक्रियेला (Recruitment Process) अखेर सुरुवात झाली आहे. ४४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२०१७ आणि २०१९ च्या भरतीप्रक्रियेसाठी ८६७ जागांसाठी भरती प्रक्रिया जानेवारी महिन्यात रद्द केली होती. आता त्यातील ४२१ पदांना कात्री लावण्यात आली आहे.

२०१७ आणि २०१९ च्या पशुसंवर्धन विभागाच्या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरून पैसेही भरून घेण्यात आले. राज्यभरातून या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल २ लाख अर्ज महापोर्टलद्वारे आले होते. आता नव्या आकृतिबंधानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

पशुसंवर्धन विभागात २००४ पासून ५८० पदे रिक्त आहेत. लम्पी स्कीनच्या वेळी पशुसंवर्धन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली होती. तसेच बाहेरूनही सेवा घेण्यात आली होती.

Animal Husbandry Department
Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागात ३ हजार १९३ पदे रिक्त

...अशा जागा भरणार
पशुधन पर्यवेक्षक...३७६
वरिष्ठ लिपिक...४४
लघुलेखक (उच्चश्रेणी)...०२
लघुलेखक (निम्नश्रेणी)...१३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ...४
तारतंत्री...३
यांत्रिकी...०२
बाष्पक परिचर...०२
एकूण...४४६

Animal Husbandry Department
Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागात कामांचा खोळंबा

प्रश्नपत्रिकांअभावी रखडली भरती
२०१७ मध्ये १३८ पदाची सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली. यामध्ये ११४ पशुवंर्धन पर्यवेक्षक, १० वरिष्ठ लिपिक, ७ लिपिक टंकलेखक, २ स्टेनो, ५ चालक अशी पदे होती.

तर २०१९ मध्ये सरळसेवा कोट्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील ७२९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. यामध्ये १४९ पशुवंर्धन पर्यवेक्षक आणि ५८० पदे परिचर पदाची होती.

या सर्व पदांसाठी राज्यातून दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते. २०१७ मध्ये ‘क’ वर्गातील पशुधन पर्यवेक्षक आणि ‘ड’ गटातील परिचर अशी १३८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कुणाल आयटी सर्व्हिसेस या खासगी संस्थेद्वारे भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार होती.

या संस्थेने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही सुरू केले होते.

मात्र, यामध्ये घोटाळा होण्याचा संशय आल्याने या संस्थेऐवजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, बालभारती, महापरीक्षा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला प्रश्नपत्रिका तयार करण्याची विनंती केली होती.

मात्र, या संस्थांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यास असमर्थ असल्याचे आयुक्त कार्यालयाला कळविले होते. दरम्यान २०१९ मध्ये ७२९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. या पदांसाठी १० ते २९ ऑगस्ट, २०१९ दरम्यान परीक्षा होणार होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com