Nashik Crop Damage : नाशिकमध्ये गारपिटीने ४३ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

Unseasonal Rain Damaged : नाशिक जिल्ह्यात ७ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने १ हजार ९७ गावांतील ७९ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात ७ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने १ हजार ९७ गावांतील ७९ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे. या पिकांचे पंचनामे प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ४३ हजार ३४० हेक्टर ८१ आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

बागायती क्षेत्रावरील कांदा पिकांचे ३५ हजार २९० हेक्टर, द्राक्षाचे ३ हजार ४१० हेक्टर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी ७६ कोटी ८६ लाख २६ हजार रुपयांच्या मदतीची मागणी कृषी विभागातर्फे नोंदवण्यात आली आहे.

एप्रिलमधील १० दिवसांमधील नैसर्गिक आपत्तीचे कृषीच्या प्राथमिक अंदाजानुसार ३७ हजार ९८१ हेक्टर ७९ आर क्षेत्र होते. आपत्तीच्या अंतिम अहवालानुसार ५ हजार ३५९ हेक्टर २ आर क्षेत्राची वाढ झाली आहे.

कोरडवाहू क्षेत्रातील ३ हेक्टर १० आर मक्याचे येवल्यातील ३ गावातील ५ शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र आहे. हेक्टरी साडेआठ हजार रुपयांनुसार या शेतकऱ्यांसाठी २६ हजार रुपयांची मदत मागण्यात आली आहे.

Crop Damage
Crop Damage E-Survey : राज्यात आता नुकसानग्रस्त पिकांचे होणार 'ई-पंचनामे'

कांदा, कांदा रोपे, मका, मिरची, गहू, टोमॅटो, बाजरी, भुईमूग, हरभरा, भाजीपाला, ऊस, पपई, वेलवर्गीय फळे अशा बागायती क्षेत्रातील ३७ हजार ५४५ हेक्टर ५७ आर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ६६९ गावांतील ६४ हजार ९७८ शेतकऱ्यांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांप्रमाणे ६३ कोटी ८२ लाख ७५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी कृषी विभागाची आहे.

द्राक्षे, डाळिंब, लिंबू, पेरू, चिकू, मोसंबी, सीताफळ, आंबा, इतर अशा बहुवार्षिक फळपिकांचे ५ हजार ७९२ हेक्टर १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. ४२५ गावातील १४ हजार ४५५ शेतकऱ्यांना त्यापोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे १३ कोटी ३ लाख २३ हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. सटाणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. १५७ गावांमध्ये ३० हजार ९७० शेतकरी बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात पीकनिहाय नुकसान:

पीक...नुकसानबाधित क्षेत्र (हेक्टर)

कोरडवाहू मका...३.१०

कांदा...३५,२१०.२३

कांदा रोपे...३०.१२

मका...४६८.५४

मिरची...८.७१

गहू...३३४.५३

टोमॅटो...८१.११

बाजरी...१४४.८३

भुईमूग...१७.३२

हरभरा...५.९९

भाजीपाला...१,०८८.८४

ऊस...९.४१

पपई...३.८०

इतर फळपिके...९.५५

वेलवर्गीय फळे...५४.६९

द्राक्षे...३,४१०.२२

डाळिंब...१,०१२.८१

लिंबू...१४.२८

पेरू...१०.५९

चिकू...५.६४

मोसंबी...३.६५

सीताफळ...१०.५९

आंबा...१,२३८.६३

इतर फळपिके...१३.४२

Crop Damage
Crop Damage In Nashik : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा

तालुकानिहाय नुकसान:

तालुका...नुकसानग्रस्त क्षेत्र(हेक्टर)

सटाणा...२२५२९.२९

नांदगाव...६,५१३.४१

दिंडोरी...२,७७१.१९

सुरगाणा...१८२३.६७

निफाड १,८४०.३३

चांदवड...१,७०२.९०

कळवण...१,४०३.३५

सिन्नर...१,२८०.५६

इगतपुरी...१,२०७.१३

नाशिक...८४३.८८

देवळा...७६६.६४

मालेगाव...३००.३६

पेठ...२६२.५०

येवला...७९.९१

त्र्यंबकेश्वर...१४.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com