Amravati Water Storage : अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के जलसाठा

Summer Season : उन्हाळा तापण्यास सुरुवात झाली असून सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी उपसा व बाष्पीभवन यामुळे दिवसेंदिवस घसरत आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Amravati News : उन्हाळा तापण्यास सुरुवात झाली असून सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी उपसा व बाष्पीभवन यामुळे दिवसेंदिवस घसरत आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४४ टक्के जलसाठा शिल्लक असला तरी अल-निनोचे संकट डोक्यावर असल्याने आगामी काळात पावसाची सरासरी बघता प्रकल्पातील पाणीसाठा जपून वापरण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. यासोबतच यावर्षी पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येण्याचे संकेत आहेत.

अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह पाणीपुरवठा करता येऊ शकणारे सहा मध्यम व ४६ लघू प्रकल्प आहेत. यातील अप्पर वर्धा धरणावर अमरावती ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह अमरावती शहर व औद्योगिक वसाहतीचा पुरवठा अवलंबून आहे.

पाणी पुरवठ्याचा सर्वाधिक ताण असलेल्या या धरणात सध्या २७७ दलघमी (४९ टक्के) साठा आहे. सहा मध्यम प्रकल्पांत ११०.६२ दलघमी (३५ टक्के) साठा आहे. मध्यम प्रकल्पांवर तालुका व ग्रामीण पाणीपुरवठा अवलंबिला आहे.

Water Stock
Water Storage In Jalgaon : खानदेशात जलसाठा घटताच

तर, लघू प्रकल्पांच्या जलसाठ्याची स्थिती बऱ्यापैकी असली तरी त्यात ४२ टक्के जलसाठा आहे. कडक उन्हाळ्याचा दीड महिना व जून महिना असे अडीच महिने पाणी पुरवठ्यावरील ताण बघता उपलब्ध जलसाठा पुरेसा नसल्याचे जलसंपदा विभागाचे मत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश गावांत पाणीपुरवठा आताच अपुरा पडू लागला आहे. सध्या सिंचनाचा ताण कमी झाला आहे. ही त्यात जमेची बाजू आहे. मात्र हवामान खात्याने अल-निनोचा संभाव्य धोका वर्तविल्याने पावसाच्या सरासरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भूगर्भातील जलपातळीतही घट

सरत्या वर्षात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. सिंचन प्रकल्पातही शंभर टक्के साठा झाला होता. मोठ्या धरणांसह मध्यम प्रकल्पाची दारे वारंवार उघडावी लागलीत. विहिरी व बोअरमधील पाणी पातळी वाढली होती. मात्र त्या तुलनेत उपसा अधिक झाल्याने व वाढते तापमान बघता भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Water Stock
Water conservation : जलसंधारणासाठी पाझर तलाव का आहेत महत्त्वाचे ?

जलसाठ्याची स्थिती (दलघमी)

अप्पर वर्धा २७७ : ४९ टक्के

शहानूर २४.६५ ५३ टक्के

पूर्णा २०.५२ ५८

चंद्रभागा २६.७२ ६४

सपन २२.४६ ५८

पंढरी १४.४४ २५

बोर्डी नाला १.८३ ३.०७

लघू प्रकल्प (४६) ९१.२६ ४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com