
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agriculture Produce Market Committee) प्रत्येकी १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. त्यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी ५०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी छाननीअंती आता ४६३ उमेदवारी अर्ज वैध ठरले.
जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा व नवापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. या वर्षी निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे.
स्थानिक स्तरावरील राजकीय गट-तट निर्माण होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सहाही बाजार समित्यांसाठी एकूण ५०३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी छाननी झाली. त्यात ३९ उमेदवारी अर्ज अवैध (नामंजूर) ठरले. त्यामुळे आता ४६३ अर्ज वैध ठरले आहेत.
आता २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. तोपर्यंत कोणकोणत्या गटातटात समझोता होतो, जागांची वाटाघाटी होते, त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करून कोणकोण अर्ज माघार घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
तालुकानिहाय वैध व अवैध उमेदवारी अर्जांची संख्या
तालुका - दाखल अर्ज- वैध - अवैध
नंदुरबार - ९३- ९१- २
शहादा - १८२ - १७५ - ०७
नवापूर- ६६- ५६ - १०
तळोदा - ८७- ७७- ०९
अक्कलकुवा- ३८- ३७ - ०१
धडगाव- ३७- २७ - १०
एकूण - ५०३- ४६३ - ३९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.