
Nagar News : नगर जिल्हा परिषदेने २०२३-२०२४ या वर्षासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ४८ कोटी आठ लाख ८९ हजार ५२ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मनोज ससे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, राजू लाकूडझोडे, योगेश आमरे, संजय आगलावे, भगवान निकम आदी खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रशासकांनी यंदा अर्थसंकल्पात जुन्या काही योजनांना कात्री लावली, तर काही नावीन्यपूर्ण योजना त्यात समाविष्ट केल्या.
नगर जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ५२५ कडबा कुट्टी, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा, बीओटीतून ४० शाळा इमारत बांधणी, मुक्त संचार गोठा, शिष्यवृत्ती पुस्तक खरेदी आणि १०० हवामान केंद्रे, तसेच जिल्हा परिषदेच्या जागा संरक्षित करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात तरतूद, हे या बजेटचे वेगळेपण आहे. इस्रो सहलीसाठी देण्यात येणाऱ्या निधीला मात्र कात्री लावण्यात आली आहे.
हे अर्थसंकल्पात मुख्यत्वे शासनाकडून मिळणारे उपकर, सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्काची रक्कम, पाणीपट्टी उपकर या बाबींवर आधारित आहे.
२०२३-२४ मध्ये अपेक्षित महसुली जमा होणारा निधी पुढीलप्रमाणे : स्थानिक उपकर, वाढीव उपकर - २ कोटी ५० लाख, मुद्रांक शुल्क - १५ कोटी, उपकर सापेक्ष अनुदान - २ कोटी, अभिकरण शुल्क - ३० लाख, गुंतवणुकीवरील व्याज ११ कोटी ३० लाख, इतर जमा ७ कोटी ४०, असे एकूण महसुली जमा ३८ कोटी ५० लाख रुपये अपेक्षित आहे.
२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात जमा बाजू ४८ कोटी आठ लाखांची असेल. यात आरंभीची शिल्लक एक कोटी नऊ लाख, जिल्हा परिषदेचा अपेक्षित महसूल ३८ कोटी ५० लाख, भांडवली जमा आठ कोटी ४८ लाखांची असेल. या अपेक्षित जमा रकमेतून तेवढेच म्हणजे ४८ कोटी आठ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले आहे.
विभागांना वाटप केलेल्या अनुदानाचा तपशील
अ प्रशासन - १ कोटी २९ लाख ६३ हजार
सामान्य प्रशासन- ९३ लाख ८१ हजार
शिक्षण - १ कोटी १९ लाख १० हजार
सा. बां. दक्षिण - ६ कोटी ७५ लाख ७० हजार
लघुपाटबंधारे- १ कोटी ६ लाख
ग्रामीण पाणीपुरवठा - ३ कोटी ३० लाख २ हजार
आरोग्य- ७७ लाख २ हजार
कृषी - ८० लाख ६७ हजार
पशुसंवर्धन- १ कोटी २९ लाख ७ हजार
समाजकल्याण - २ कोटी ५४ लाख
दिव्यांग कल्याण - ६० लाख
महिला व बालकल्याण - १ कोटी २० लाख
ग्रामपंचायत विभाग - ८ कोटी ८६ लाख २ हजार
अर्थ विभाग- १ कोटी १३ लाख १ हजार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.