Landslide In Thane : ठाणे जिल्ह्यात दरडींच्या छायेखाली ४९ विभाग

Thane News : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगर टेकड्यांनी व्यापलेला आहे. त्यात या डोंगरांवर आणि टेकड्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.
Thane Mountain News
Thane Mountain NewsAgrowon

Thane Mountain News : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगर टेकड्यांनी व्यापलेला आहे. त्यात या डोंगरांवर आणि टेकड्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र, हेच अतिक्रमण आता नागरिकांच्या मुळावर उठले आहे. डोंगर माथ्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे माती भूसभुशीत होवून दरड कोसळण्याच्या घटना घडून यामध्ये जीवितहानी देखील होत असते.

ही जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ ठिकाणे ही दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सात महापलिका क्षेत्रांसह ग्रामीण क्षेत्र आणि नगरपालिका हद्दीत पावसाळ्याच्या काळात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यात दुसरीकडे डोंगर माथ्यांच्या भागत राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून येते. '

त्यानुसार ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील महापलिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील दरड प्रवण क्षेत्रांची माहिती घेवून त्याची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येते. तसेच या पाहणीत तेथील आताची परस्थिती, लोकसंख्या, दुर्घटना घडल्यास वेळप्रसंगी नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी व्यवस्था करणे आदींचा आढावा घेतला जातो.

त्यानुसार त्यासंदर्भातील उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनासह नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना देण्यात आली आहेत.

Thane Mountain News
Manipur Landslide : मणिपुरात दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू

दरड कोसळून होणारी दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ ठिकाणी ही दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणच्या नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यात डोंगरमाथ्यावर धोकादायक ठिकाणी आशा वस्त्या जेव्हा उभ्या राहतात. तेव्हाच दक्षता घेणे गरजेचे आहे.

तेव्हा केलेल्या दुर्लक्षपायी मोठी किंमत मोजावी लागते. परिणामी त्याला वेळीच अटकाव घालणे गरजेचे आहे. तसेच दरड कोसळल्यास काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचना देखील संबंधित यंत्रांना देण्यात आल्या आहेत.

अतिक्रमणांचा फटका

स्वस्तात घरे देण्याच्या नावने डोंगरांवर आणि टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रम केले जाते. अनेक गरजू आपल्या आयुष्याची जमापुजी येथे घर घेण्यासाठी खर्च करतात. मात्र, हेच अतिक्रमण आता नागरिकांच्या मुळावर उठले आहे. डोंगर माथ्यांवर बांधकाम केल्यामुळे परिसरातील माती भूसभुशीत होते.

त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडून यांमध्ये जीवितहानी देखील होत असते. दरड कोसळून होणारी दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार विविध ठिकाणांचे सर्वेक्षण करून दरड प्रवण क्षेत्रांची यादी जाहीर करण्यात अाली आहे. या यादीनुसार त्या भागात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Thane Mountain News
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू 

तहसीलनुसार दरड प्रवणक्षेत्र

ठाणे - १४

नवी मुंबई - ५

मिरा भाईंदर- १

भिवंडी- ८

उल्हासनगर - ३

महापालिका परिसरातील दरड प्रवणक्षेत्र

ठाणे - १४

नवी मुंबई - ५

मिरा भाईंदर- १

भिवंडी - ८

उल्हासनगर - ३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com