Wheat Damage : शॉर्टसर्किटने शेतकऱ्यांचा गहू जळून खाक; बुलडाणा जिल्ह्यातील घटना

संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे शॉर्टसर्किटमुळे पाच एकरांतील उभा गहू जळून खाक झाला.
Wheat Damage
Wheat DamageAgrowon

Buldana News : संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे शॉर्टसर्किटमुळे पाच एकरांतील उभा गहू जळून खाक (Wheat Crop Fire) झाला.

या नुकसानीनंतर महावितरण, कृषी विभागाच्या (Agriculture Department) कर्मचाऱ्यांसह, पोलिस पाटील, ग्रामंपचायत सरपंचांच्या उपस्थितीत पंचनामाही झाला. या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

कोद्री गावातील शेतकरी शिवहरी दामोदर खोंड यांच्याकडे गावातीलच धर्माळ संस्थानचे शेत ठोक्याने असते. यंदा या शेतात त्यांनी पाच एकरांमध्ये गव्हाची पेरणी केली होती. या आठवड्यात गव्हाची काढणी केली जाणार होती.

मात्र ३१ मार्चच्या सायंकाळी पातुर्डा बुद्रुक परिसरात अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. कोद्री शिवारात विजेच्या तारांचे घर्षण होऊन आगीचे गोळे शेतात पडले. वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने वाढत गेली.

Wheat Damage
Forest Fire In Maharashtra : वणव्याच्या झळा कशा आटोक्यात आणायच्या?

आग विझवण्यापूर्वीच पाच एकरांतील गहू पूर्णतः खाक झाला, अशी माहिती मिळाली. खोंड यांना ही माहिती पडताच त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता शेतात काहीही शिल्लक राहिले नव्हते. यामुळे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले.

याबाबत माहिती मिळताच महावितरण, कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस पाटील, सरपंचाला माहिती दिली.

शनिवारी (ता. एक) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वायरमन अमर पवार, कृषी सहायक प्रवीण टाकसाळे, पोलिस पाटील संजय खोंड, सरपंच पती नरेश खोंड यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. हा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे.

धर्माळ संस्थानची शेती मागील बऱ्याच वर्षांपासून ठोक्याने करीत आहे. यावर्षी पाच एकरांत गहू लागवड केली होती. तीन-चार दिवसांत हार्वेस्टरच्या साह्याने पीक काढणार होतो. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ते पूर्णतः जाळून खाक झाले. माझे अंदाजे दोन लाखांपर्यंत नुकसान झाले असून संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी.
शिवहरी खोंड, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com