Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून नागपूर जिल्ह्यात ५ कोटी रूपये वितरित

Chief Minister's Medical Assistance Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरण उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला आहे.
Chief Minister's Medical Assistance Fund
Chief Minister's Medical Assistance Fund Agrowon

Nagpur News : मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरण उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला आहे. या उपक्रमाकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने सत्तांतरणापूर्वी अडीच वर्षात महिन्याला २२ लाख रुपये रुग्णांना मिळायचे आता ही रक्कम प्रतिमाह ५४ लाख झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून हृदयरोग, मेंदूरोग, नवजात बालकांचे आजार, मूत्रपिंड प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, कॉकलियर इम्प्लँट, डायलिसीस, हृदय प्रत्यारोपण, सी.व्ही.ई., ब्रोन मॅरो ट्रान्सप्लँट, खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, जळीत रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, अस्थिबंध आदी गंभीर आजारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसाहाय्य दिले जाते.

Chief Minister's Medical Assistance Fund
Nagpur News: ऑरेंज सिटीतील शेतकऱ्यांना करवंदांनी घातली भुरळ

मुंबईनंतर नागपूर येथे हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी डिसेंबर २०१९ ते जून २०२२ या अडीच वर्षांच्या काळामध्ये ६ कोटी ४१ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा निधी वितरित केला गेला.

सत्ता बदलानंतर जुलै २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ४ कोटी ९२ लक्ष ६१ हजार निधी वितरित केला गेला आहे. ही मदत पूर्वी महिन्याला २२ लाख होती. आता महिन्याला ५४ लाख झाली आहे.

याठिकाणी कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते ५.४५ या काळामध्ये एक साधा अर्ज भरून वैद्यकीय सुविधे संदर्भात लाभ घेतला जाऊ शकतो. १ लाख ८० हजार यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी नागरिकांनी ई-मेलवर सुद्धा ऑनलाइन अर्ज केल्यास स्वीकारण्याची सूचना केली आहे. अर्जासोबत डॉक्टरांनी केलेले रोगाचे निदान प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाजपत्रक, आधारकार्ड किंवा रेशनकार्ड आवश्यक आहे.

हे दस्ताऐवज cmrfnagpur@gmail.com या मेलवर पाठविल्यास अर्ज दाखल केला जातो. या ठिकाणचा दूरध्वनी क्रमांक (०७१२) २५६०५९२ असा असून कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शनही केले जाते. या योजनेमध्ये मंजूर प्रकरणातील पैसा थेट हॉस्पिटलच्या खात्यात जमा होतो. उपचार सुरू असतानाच ही मदत मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com