Women ST Bus Concession : महिलांना बसच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; आजपासून निर्णयाची अंमलबजावणी

या योजनेला एसटी महामंडळाकडून महिला सन्मान योजना असे नावही देण्यात आले आहे.
Women ST Bus Concession
Women ST Bus ConcessionAgrowon

Women ST bus Concession : राज्यातील महिलांना सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय १७ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता महिलांना कोणत्याही बसच्या दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

राज्य अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. त्याचीच एसटी महामंडळाकडून राज्यात अंमलबजावाणी करण्यात येत आहे. या दरातील सवलतीबाबतचे पत्रक एसटी महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Women ST Bus Concession
ST Recruitment : सोलापुरात ‘एसटी’मध्ये ३३६ तरुणांना नियुक्त्या

या योजनेला एसटी महामंडळाकडून महिला सन्मान योजना असे नावही देण्यात आले आहे. या योजनेतील रक्कमेचा भार राज्य सरकार उचलेल. एसटी महामंडळाला शासनाकडून रक्कम देण्यात येणार आहे.

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध समाज घटकांना ३३ ते १०० टक्के तिकीट दरात सवलत देते. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षावरील नागरिकांना सर्व बसेस मधून मोफत प्रवासाची योजना जाहीर केली आहे.

Women ST Bus Concession
ST Bus Transport : मंगळवेढा आगाराची बस वाहतूक गती कधी वाढणार?

तसेच ६५ ते ७५ वर्षांवरील नागरिकांना सर्व बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. या दोन्ही समाज घटकांना घोषणेप्रमाणे प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.

त्याची आर्थिक रक्कम एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात येते, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com