Kharif Crop Loan : खरिपात कपाशीला हेक्‍टरी ६० हजार पीककर्ज

Kharif Season : खरीप हंगामाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना खरीप पीककर्ज वाटपाचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Amravati Crop Loan News : खरीप हंगामाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना खरीप पीककर्ज वाटपाचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सोयाबीनकरिता ५१, तर कपाशीकरिता ६० हजार रुपये प्रती हेक्‍टर दराने कर्ज मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या सरासरी दोन महिने आधीच पीककर्जाचे दर निश्‍चित केले जातात. यंदा मात्र त्याकरिता विलंब झाला आहे. त्यामुळे दर निश्चितीपूर्वीच काही बॅंकांनी कर्जवाटप सुरू केले होते. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कर्जाचे टार्गेट निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार जिल्ह्याकरिता यंदाच्या खरिपात कर्जवाटपासाठी १४५० कोटी रुपयांचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यासोबतच तांत्रिक गट सभेने निश्‍चित केलेले दर बॅंकांनी स्वीकृत केले आहेत. यामध्ये सोयाबीनला हेक्‍टरी ५१ हजार, तर कपाशीकरिता ६० हजार रुपयांचा दर पीककर्जाकरिता निश्‍चित करण्यात आला आहे.

Crop Loan
Crop Loan : थकित कर्जरक्कम तडजोडीअंती भरण्यास तयार

असे आहेत दर (हेक्‍टरी रुपयात)

कापूस (कोरडवाहू) ६० हजार

कापूस (बागायती) ७० हजार

ज्वारी - ३१ हजार

तूर - ४० हजार

सोयाबीन - ५१ हजार

सूर्यफूल -२७ हजार

व उडीद- २४ हजार

गहू - ४२ हजार

करडई - ३४ हजार

हरभरा (जिरायती) - ४० हजार

हरभरा (बागायत) - ४५ हजार

धान - ४५ हजार

कांदा - ७२ हजार

भाजीपाला - ४५ हजार

भुईमूग खरीप- ४२ हजार

भुईमूग (उन्हाळी)- ५० हजार

संत्रा- १.०५ लाख

केळी - १.१० लाख

ऊस - १.४५ लाख

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com