Water Tanker : नाशिक जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी १५० गावांत ६०० बंधारे

कामांची रक्कम सुमारे १०० कोटी रुपये असून यातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांतील १५० गावांत ५ ते ३० लाखांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.
Water Tanker
Water TankerAgrowon

Nashik Water Tanker : जिल्ह्यातील दुष्काळी गावांचे चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (CEO Ashima Mittal) यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘मिशन भागीरथी प्रयास’ हाती घेतले आहे.

याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची ६०० कामे हाती घेतली आहेत.

कामांची रक्कम सुमारे १०० कोटी रुपये असून यातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांतील १५० गावांत ५ ते ३० लाखांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.

गुजरात सीमावर्ती भागातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत, थेट गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केल्यानंतर, सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते.

Water Tanker
Mission Bhagirathi : जिल्हा टॅंकर मुक्तीसाठी ‘मिशन भगीरथी प्रयास’

त्यानंतर मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करत माहिती घेतली. त्या वेळी सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ असतो. येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी मित्तल यांनी रोहयोतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी ‘मिशन भागीरथी’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांत सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली. त्यात सुरगाणा, पेठ, सटाणा, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील १५० गावे निश्‍चित केली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात बंधारे बांधण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व ठिकाणी एकाचवेळी बंधारे बांधून त्या गावातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवले जाईल. पहिल्या वर्षी १५० गावांमध्ये ६०० कामे हाती घेतली जाणार आहेत. रोजगार हमी योजनेतून बंधारे बांधण्यासाठी ९० टक्के काम यंत्राने व १० टक्के काम मजुरांकडून करून घेण्याची परवानगी आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठीचे ६०:४० प्रमाण राखत जिल्हा परिषदेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com