Chandrapur Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत सहा हजारांवर मतदारांची भर

Bajar Samiti Election : चंद्रपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी १३ हजार १९७ मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे.
Market Committee Election
Market Committee ElectionAgrowon

Chanadrapur Election Update : चंद्रपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचा (Chandrapur Market Committee Election) ज्वर चांगलाच वाढला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी १३ हजार १९७ मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यादीत ६ हजार ३१० नव्या मतदारांची भर पडली असून, हे मतदार आता २१६ संचालकांची निवड करणार आहेत.

शेतीमालाची सर्वाधिक उलाढाल आणि त्या माध्यमातून सेसद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न यात जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या आघाडीवर आहेत.

यातील कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल या बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात रविवारी (ता.३०) निवडणूक होणाऱ्या बाजार समित्यांमध्ये गोंडपिपरी, भद्रावती व पोंभूर्णा बाजार समित्यांचा समावेश आहे.

Market Committee Election
Pune APMC Election : राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला एक जागेवर बोळवण

या १२ बाजार समित्यांची आर्थिकस्थिती चांगली असल्याने त्यावर आपले वर्चस्व राहावे यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) अशा सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. य निवडणुकीत माजी संचालकांनी देखील आपली शक्‍तीपणाला लावली आहे.

प्रत्येक बाजार समितीत १८ संचालक याप्रमाणे एकूण २१६ संचालक निवडून द्यायचे आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार सहकार, अडते व व्यापारी, हमाल व मापाडी असे मतदार संघ निश्‍चित करण्यात आले आहेत.

सहकार मतदार संघात ४५०२ तर ग्रामपंचायत मतदार संघात ६३१० मतदार हे मतदानाचा हक्‍क बजावतील. निवडणूक होणाऱ्या १२ बाजार समित्यांशी जिल्ह्यातील ३७५ सहकारी संस्था व ७६६ ग्रामपंचायती संलग्नित आहेत.

संघनिहाय्य मतदार

सहकारी संस्था : ३५०२

ग्रामपंचायत : ६३१०

अडते-व्यापारी : १७१९

हमाल-मापाडी : ६६६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com