Kharip Sowing News: पुणे विभागात खरिपाच्या ६५ टक्के पेरण्या

पुणे विभागात आतापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी सहा लाख ९६ हजार ८९८ हेक्टर म्हणजेच ६५ टक्के पेरण्या (Kharip Sowing) झाल्या आहेत.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

पुणे : जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी सहा लाख ९६ हजार ८९८ हेक्टर म्हणजेच ६५ टक्के पेरण्या (Kharip Sowing) झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी झाली आहे, तर नगर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पुणे विभागात नगर जिल्ह्यात एक ते १५ जून या कालावधीत सरासरीच्या ९७.५ मिलिमीटरपैकी ८१.० मिलिमीटर म्हणजेच ८३ टक्के पाऊस पडला. तर, पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी ३३८.२ मिलिमीटर म्हणजेच १०९ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या ९४.८ मिलिमीटरपैकी १०२.७ मिलिमीटर म्हणजेच १०८ टक्के पाऊस (Rainfall) पडला.

यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पंधरवड्यात (ता. १ ते १५ जुलै) मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ तालुक्यांमध्ये जोरदार, तसेच वेल्हे तालुक्यात अतिजोरदार पर्जन्याची नोंद झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Rainfall) नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

सध्या नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात कुठेही दुबार पीक पेरणी झालेली नाही. तसेच अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy rain) नुकसान झालेले नाही. बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, मका व कापूस आदी पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे विभागात जुलै महिन्यामध्ये सर्वदूर पावसामुळे भात पिकाच्या (Paddy) पुनर्लागवडीस सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यातील पडलेल्या पावसामुळे बाजरी पिकाच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. बाजरी, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीक्षेत्रात घट होऊन सोयाबीन (Soybean Cultivation) पीक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

सततच्या पावसामुळे पेरणी झालेले सोयाबीन, तसेच भाजीपाला पिकांचे (Vegetable Crops) नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही दुबार पेरणी झालेली नाही. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले नाही. भात व रागी रोपवाटिकांतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत.सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीची कामे वाफशाअभावी खोळंबलेली आहेत. एकंदर पीक परिस्थिती चांगली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ४,२९,७६४ -- ७४

पुणे --- १,९५, ७१० -- ८३,४५६ --- ४३

सोलापूर --- २,८९,५७० -- १,८३,६७८ -- ३२

एकूण --- १०,६५,०४८ -- ६,९६,८९८ --- ६५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com