Crop Damage : संग्रामपूर, शेगाव तालुक्यांतील ७,०९४ हेक्टरला फटका

दोन दिवस झालेला संततधार पाऊस, त्यानंतर नदीला आलेल्या पुराचा खरिपातील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना फटका बसला.
Crop Damage : संग्रामपूर, शेगाव तालुक्यांतील ७,०९४ हेक्टरला फटका

बुलडाणा ः जिल्ह्यात या आठवड्यात दोन दिवस झालेला संततधार पाऊस (Continues Rain), त्यानंतर नदीला आलेल्या पुराचा खरिपातील सोयाबीन (Kharif Soybean), तूर, कपाशी (Cotton) या पिकांना फटका (Kharif Crop Damage) बसला. संग्रामपूर तालुक्यात ४,५००, तर शेगाव तालुक्यात २,५५६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे शेगाव तालुक्यात ९० हेक्टर जमीन वाहून गेली आहे.

Crop Damage : संग्रामपूर, शेगाव तालुक्यांतील ७,०९४ हेक्टरला फटका
Paddy : खेड, आंबेगावच्या पश्चिम भागात पावसामुळे भात रोपांचे नुकसान

जिल्ह्यात १७ व १८ जुलैला जोरदार पाऊस झाला. काही मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली होती. संग्रामपूर तालुक्यातील कवठळ मंडळात २४ तासांत ११० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला होता. मनसगाव मंडळातही ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच, या दोन तालुक्यांच्या सीमेवरून पूर्णा नदी वाहते. या नदीला मोठा पूर वाहल्याने नदी काठावरील शेतांमध्ये पाणी शिरले. पूर्णेच्या उपनद्याही दुथडी भरून वाहल्या. अनेक तासांपर्यंत पुराचे पाणी कायम राहल्याने शेतांमधील पिके पाण्यात बुडाली होती.

Crop Damage : संग्रामपूर, शेगाव तालुक्यांतील ७,०९४ हेक्टरला फटका
नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान

कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार संग्रामपूर तालुक्यात ४,५०० हेक्टरवरील पिके बाधित झाली. पावसाच्या पाण्याने ही पिके खरडून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेगाव तालुक्यातही अशीच परिस्थिती तयार झाली होती. २,५५६ हेक्टरवरील पिके पाण्याने वाहून गेली आहेत.

या तालुक्यांमध्ये खरिपाची पेरणी जवळपास पूर्ण झाली होती. पिके ताशी लागली होती. या भागात सोयाबीन अधिक तूर, कपाशीची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. आता खरडलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने पेरणी करावी लागणार आहे.

शासनाच्या मदतीची आस

पाऊस, पुरामुळे नुकसान झालेल्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातील शेतकरी शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अद्याप या भागात पंचनामे सुरू झालेले नाहीत. यंत्रणांनी तातडीने शेतशिवारांना भेटी देत सर्वेक्षण करण्याचे व मदत देण्याबाबत पाऊल उचलण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com