Crop Insurance: वऱ्हाडात ७८ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) काढण्यासाठी कृषी विभागाकडून वारंवार सूचना केल्या जात असल्याने शेतकऱ्यांमधून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत वऱ्हाडात सुमारे ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

अकोलाः या खरीप हंगामासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) लागू झाली असून, पीकविमा उतरवण्याची ३१ जुलै अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी कृषी विभागाकडून वारंवार सूचना केल्या जात असल्याने शेतकऱ्यांमधून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत वऱ्हाडात सुमारे ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

पंतप्रधान पीकविमा खरीप योजनेअंतर्गत वेगवेगळ्या पिकांचा पीकविमा (Crop Insurance) काढण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात ‘बीड पॅटर्न’चा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांमधून पीकविमा (Crop Insurance) काढण्याची लगबग सुरू आहे. आतापर्यंत या भागात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये सरासरी ९५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. सलग पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरण्या आता येत्या आठवड्यात पूर्ण होतील. सोयाबीन, तूर, कपाशी या तीन पिकांचेच लागवड क्षेत्र अधिक आहे.

या पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत

अकोला जिल्ह्यात ३० हजार ८५० शेतकऱ्यांनी विमा (Crop Insurance) काढला असून, २४ हजार ५२४ हेक्टर संरक्षित झाले आहे. शेतकऱ्यांनी २ कोटी २५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला. बुलडाणा जिल्ह्यातील ३७,७३० शेतकऱ्यांनी ३०,११९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यापोटी ३ कोटी ४७ लाख रुपये हप्ता भरणा केला.

वाशीम जिल्ह्यात १० हजार ३८ शेतकऱ्यांनी ८,०४१ हेक्टरचा विमा काढला. या शेतकऱ्यांनी ८७ लाख रुपये विमा हप्ता भरला. या तीन जिल्ह्यांनी अमरावती विभागात विमा काढण्यात आघाडी घेतली आहे. विभागात एक लाख १० हजार ५८६ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यामध्ये ७८ हजार ६४८ शेतकरी वऱ्हाडातील आहेत. अजून १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विमा काढणाऱ्यांच्या एकूण संख्येत भर पडणार आहे.

पीकविमा काढलेले शेतकरी

जिल्हा विमाधारक

बुलडाणा ३७७३०

अकोला ३०८५०

वाशीम २३६८०

एकूण- ७८६४८

जिल्हा सरासरी क्षेत्र लागवड टक्केवारी

बुलडाणा ७३५३२१ ६९९५४८ ९५

अकोला ४५६०९९ ४४७३२६ ९८

वाशीम ४०५१०४ ३८२५२६ ९४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com