
Parbhani News : चालू आर्थिक (२०२२-२३) वर्षात रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात बुधवार (ता. १५) पर्यंत एकूण ६५ हजार १५० शेतकऱ्यांना ५०३ कोटी ६५ लाख रुपये (८०.६१)टक्के) पीक कर्ज वाटप झाले आहे. पीक कर्ज (Crop Loan) वाटपात राष्ट्रीयकृत बँका (Nationalized banks) आघाडीवर आहेत.
त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Bank),महाराष्ट्र ग्रामीण बँक (Rural bank), खासगी बँका असा क्रम आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.
त्यात राष्ट्रीयकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.
१५ फेब्रुवारी अखेर राष्ट्रीयकृत बँकांनी ३२ हजार ८३१ शेतकऱ्यांना ३२१कोटी ९० लाख रुपये (८८.९९ टक्के) पीककर्ज वाटप केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५ हजार ७६६ शेतकऱ्यांना ५४ कोटी ५८ लाख रुपये (६२.७७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ हजार ५०३ शेतकऱ्यांना १११ कोटी ५७ लाख रुपये (८६.३७ टक्के), खासगी बँकांनी १ हजार ५० शेतकऱ्यांना १५ कोटी ६० लाख रुपये (३३.२३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
आजवर ६ हजार २८५ शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ७० कोटी ५७ लाख रुपयाचे नवीन पीककर्ज आणि ५८ हजार ८६५ शेतकऱ्यांनी केलेल्या ४३३ कोटी ८ लाख रुपयाच्या नूतनीकरण केलेल्या कर्जाचा समावेश आहे. गतवर्षी (२०२२) १५ फेब्रुवारी पर्यंत ४० हजार १०१ शेतकऱ्यांना २८८ कोटी ९३ लाख रुपये (४७.६० टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले होते.
रब्बी पीककर्ज वाटप स्थिती १५ फेबुवारी पर्यंत (कोटी रुपये)
बँक -उद्दिष्ट - वाटप रक्कम - शेतकरी संख्या - टक्केवारी
भारतीय स्टेट बँक -२३१.५८ २८७.९१ २९६७५ १२४.३२
महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ ५४.५८ ५७६६ ६२.७७
जि.म.सहकारी बँक १२९.१८ १११.५७ २५५०३ ८६.३७
बँक ऑफ बडोदा २६.६९ ७.६२ ८६२ २८.५५
बँक ऑफ इंडिया ४.८० १.२८ १०३ २६.६७
बँक ऑफ महाराष्ट्रा ३२.७६ १४.६३ ११७२ ४४.६६
कॅनरा बँक - १९.१९ ५.३६ ५३३ २७.९३
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४.९० १.१२ ११७ २२.८६
इंडियन बँक ९.७८ १.५२ १३९ १५.५४
इंडियन ओव्हरसीज बँक ४.२१ ०.७५ ५८ १७.८१
पंजाब नॅशनल बँक ४.३९ ०.८० ७३ १८.२२
युको बँक ९.५८ ०.४१ ४० ४.२८
युनियन बँक ऑफ इंडिया १३.८५ ०.५० ५८ ३.६१
अॅक्सिस बँक ५.०७ ०.६१ १४ १२.०३
एचडीएफसी बँक १५.४७ ३.१९ १६२ २०.६२
आयसीआयसी बँक १२.२४ १०.८२ ७१७ ८८.४०
आयडीबीआय बँक १४.१६ ०.९८ १५७ ६.९२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.