Wardha-Nanded Railway Project : वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपयांची मदत

वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर अंतराच्या या ट्रॅकवर एकूण २४ स्थानके असणार आहेत.
Railway
RailwayAgrowon

Yavtmal News : वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पामुळे (Wardha-Nanded Railway Project) जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या कामांना गती आलेली दिसत आहे.

असे असतानाही निधीची कमतरता होती. यंदाच्या अर्थसंकल्पात (budget2023) या रेल्वे प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेरुळाच्या कामालाही आता गती येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग आलेला आहे. सध्या जिल्ह्यात जोरात मातीकाम सुरू आहे.

जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या कामाने गती घेतलेली आहे. सध्याच्या स्थितीत ट्रॅकवर खोदकाम, मातीकाम, दबाई आदी कामे सुरू आहेत.

Railway
Land Acquisition : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी पुन्हा थेट खरेदीने भूसंपादन

या रेल्वे प्रकल्पाकरिता जवळपास एक हजार १४५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदी व नाल्यांवरील रेल्वे पूल, गावे व शेतातील अंडरपास या कामांना सुरुवात झाली आहे.

विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा हा रेल्वेप्रकल्प केंद्र सरकारने विशेष प्रकल्पात समाविष्ट केला आहे. या प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भूप्रदेशाला जोडणाऱ्या या प्रकल्पाची मागणी अनेक वर्षांपासून होती.

या परिसरातून रेल्वे झाल्यानंतर व्यापारासोबतच कृषी उद्योग व्यापारालासुद्धा चालना मिळणार आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर अंतराच्या या ट्रॅकवर एकूण २४ स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाला उशीर होत असल्याने प्रकल्पाची किंमत वाढत आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यवतमाळपर्यंत मातीकाम पूर्ण झाले असून, पूल उभे झाले आहेत.

Railway
Indian Agriculture : शेतीतील निर्णय प्रक्रियेतही हवी महिला

वतमाळच्या पुढे मातीकाम सुरू आहे. काही भागात मोठ्या पुलांची कामे सुरू झालेली असून, या निधीमुळे कामाला गती मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हावासीयांना या रेल्वेची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com